Monday, January 12, 2026

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द

मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये स्वतंत्र सांस्कृतिक विभागाची स्थापना करणार तसेच शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेत पर्यटन विभागाची स्थापना करणार असल्याची घोषणा भाजप, शिवसेना आणि रिपाइं आठवले गट यांच्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात करण्यात आली.

महायुतीच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणूक २०२६चा वचननामा जाहिर केला. विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई अंतर्गत जाहिर केलेल्या या वचननाम्यामध्ये भाजप, शिवसेना आणि रिपाइं (ए) महायुतीने मुंबईतील कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देऊन शहराचे सौंदर्य वाढवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शहरात मुंबईमहानगर पालिकेतर्फे कला प्रदर्शनी, संगीत कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे वचननाम्यात म्हटले आहे.,

फक्त मराठी चित्रपटा करीता खास मराठी मल्टिप्लेक्स

मुंबईच्या प्रत्येक विभागात मराठी नाटक, लोककला आणि साहित्यासाठी सुसज्ज 'मराठी कला केंद्र' आणि अभ्यासिकेची उभारणी करण्याची घोषणा करतानाच महायुतीने फक्त मराठी चित्रपटा करीता खास मराठी मल्टिप्लेक्स उभारणार असल्याचे सांगत मराठी चित्रपटांना भविष्यात चित्रपटगृह उपलब्ध व्हावेत आणि मराठी चित्रपट चालले जावेत यासाठी पुढाकार घेतलेला आहे. एवढेच नव्हेतर मराठी कलाकार संस्थांना महापालिकेतर्फे पाठबळ देण्यात येईल,असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. याशिवाय रवींद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुनर्विकास करणार व आवश्यकतेनुसार ३ नवीन नाट्यगृहे उभारण्यासह मुंबईतील 'होतकरू' कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मोफत 'ओपन एअर थिएटर' आणि कमी दरात रेकॉर्डिंग स्टुडिओ उपलब्ध करून देणार असल्याचेही वचन महायुतीने दिले आहे.

शाळेतील अभ्यासक्रमात मुंबईचा मराठी इतिहास

शाळेतील अभ्यासक्रमात मुंबईचा मराठी इतिहास' आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची माहिती देणाऱ्या विशेष पाठांचा समावेश करण्याचा निर्धार करत महायुतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त पंचवार्षिक उपक्रम राबवण्याकरिता समिती स्थापन करण्याची आणि त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची घोषणा केली. यामध्ये मराठी तरुणांसाठी शिक्षण-रोजगार-उद्योजक - यांच्याकरिता धोरण राबवणे,मुंबई महानगरपालिका रुग्णालयाच्या सलग्न हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ उभारणे, मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्याकरिता उपाययोजना करण्यात येतील मराठी ग्रंथालय व संस्कृतिक केंद्राची संख्या वाढवणे तसेच मराठी तरुणांसाठी मुंबई फेलोशिप सुरू करणे, परवडणाऱ्या घरांचे धोरण करून मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार होण्यापासून रोखण्याकरता त्याची निती बनवणे आदींचा समावेश आहे.

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभागाची स्थापना

मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमध्ये स्वतंत्र सांस्कृतिक विभागाची स्थापना करण्याची घोषणा महायुतीने केली आहे. याशिवाय ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) बूथचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा अनुभव आणि वैभव पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. तसेच दक्षिण मुंबईतील पुरातन इमारती, किल्ले जसे की वरळी, माहिम, धारावी किल्ला शिवाय मंडपेश्वर, जोगेश्वरी लेणी तसेच गेटवे ऑफ इंडिया परिसराचे जागतिक दर्जाचे सुशोभीकरण व 'लाईट अँड साऊंड शो' करणार,ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) बूथचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा अनुभव आणि महाराष्ट्राचे वैभव पर्यटकांपर्यंत पाहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतील पुरातन इमारती, किल्ले (उदा. वरळी, माहिम, धारावी किल्ला) तसेच लेणी (मंडपेश्वर, जोगेश्वरी इ.) आणि गेटवे ऑफ इंडिया परिसराचे जागतिक दर्जाचे सुशोभीकरण व 'लाईट अँड साऊंड शो' केला जाईल असेही वचन दिले आहे.

हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचे संग्रहालय

मुंबईची मूळ संस्कृती असलेल्या कोळीवाड्यांमध्ये 'होम स्टे' आणि 'खाद्य पर्यटन' विकसित करून पर्यटकांना अस्सल मुंबईचा अनुभव देणार. तसेच हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रालय उभारणार असल्याची घोषणा महायुतीने केली आहे.

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका

स्पर्धा परीक्षांचा (एपीएससी व युपीएससी) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये वातानुकूलित, वाय-फाय सज्ज आणि चोवीस तास सुरू राहणा-या अभ्यासिका उभारणार, उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या भूमिपुत्र विद्यार्थ्यांना विशेष 'मुंबई रत्न' शिष्यवृत्ती योजना चालू करणार. याशिवाय महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवत्ता वाढीचे स्वयंसिद्ध भवन उभारणार,

Comments
Add Comment