Sunday, January 11, 2026

निवृत्ती नियोजनामध्ये सुरक्षितता व वाढीचे संतुलन राखले पाहिजे : शीतल देशपांडे

निवृत्ती नियोजनामध्ये सुरक्षितता व वाढीचे संतुलन राखले पाहिजे : शीतल देशपांडे

मुंबई (प्रतिनिधी) : निवृत्तीचे नियोजन हा जीवनातील आर्थिक सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. या नियोजनामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनामध्ये आर्थिक सुरक्षितता, स्थिरता आणि समाधानाची खात्री मिळते. कामामधून निवृत्त झाल्यानंतर तुमचे नियमित उत्पन्न बंद होते, पण खर्च सुरू राहतात, ज्यामध्ये वैद्यकीय गरजांमुळे अधिक भर होते. योग्य नियोजन केले नाही तर जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी, जीवनावश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. निवृत्तीचे नियोजन काळासह या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी जमा होण्यास मदत करते, ज्यासह तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन कोणत्याही अर्थिक अडचणीशिवाय आरामात व स्वावलंबीपणे जगू शकाल. निवृत्तीसाठी गुंतवणूक करताना गुंतवणूक किमान आर्थिक विकास आणि महागाई यानुसार वाढली पाहिजे. किमान परताव्याचे लक्ष्य ठरवताना आर्थिक विकास दर आणि 'महागाई दर यांचा विचार केला पाहिजे. तुमची गुंतवणूक महागाईपेक्षा संथगतीने वाढत असेल तर जीवनाश्यक गरजांची पूर्तता करण्यामध्ये आणि निवृत्तीची उद्दिष्टे गाठण्यामध्ये अडथळे येऊ शकतात.

Comments
Add Comment