Monday, January 12, 2026

सोन्याचांदीत वादळ सोन्यात २% व चांदीत ५% उसळी चांदी २७०००० पार

सोन्याचांदीत वादळ सोन्यात २% व चांदीत ५% उसळी चांदी २७०००० पार

मोहित सोमण: रशिया युक्रेन युएस व्हेनेझुएला आता इराण अमेरिका यांच्यातील संघर्ष पुढे येऊन ठेपला असता अस्थिरतेचा महामेरू निश्चित झाला. याच कारणामुळे आज कच्च्या तेलासह सोन्या चांदीच्या दरात वादळी वाढ झाली आहे. आज नव्या आकडेवारीनुसार सोने प्रति तोळा थेट १६९० व चांदी प्रति किलो १०००० रुपयांनी महागली आहे. एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याचा दर थेट २% व चांदीचा दर थेट ५% उसळला आहे. त्यामुळे मोठी वाढ झाल्याने सोन्याचांदीचे दर सामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत असे दिसते. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६९ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२७ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४२१५ रुपयांवर, २२ कॅरेट सोन्यासाठी १३०३० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०६६१ रूपयांवर पोहोचले आहेत. तर २४ कॅरेट प्रति ग्रॅम दरात १६९० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५५० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२७० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४२१५० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १०६६१० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात दुपारी १ वाजेपर्यंत १.८६% वाढ झाल्याने दरपातळी १४१४०१ पातळीवर पोहोचली. तर जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारी १ वाजेपर्यंत २.०१% वाढ झाली असून युएस गोल्ड स्पॉट दरात १.५६% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ७१.१५ औंस या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने फेडरल रिझर्व्हला संभाव्य फौजदारी खटल्याची धमकी दिल्यानंतर वॉशिंग्टनमधील राजकीय अनिश्चितता आणखी वाढल्याचे जाणकारांचे मत आहे. तसेच या राजकीय अस्थिरतेसह युएस अर्थकारणातील घसरणाऱ्या पातळीचा परिणाम जागतिक कमोडिटीत दिसून आला.त्यामुळे सोन्याच्या किंमतीला आणखी आधार मिळाला आहे. इराणमधील वाढती अशांतता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हवरील वाढता राजकीय दबाव आणि अमेरिकेच्या नोकऱ्यांची कमकुवत आकडेवारी यामुळे सुरक्षित मालमत्तांच्या मागणीला गुंतवणूकदारांकडूनच चालना मिळाल्याने, सोमवारी आशियाई बाजारात सुद्धा सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या.

उपलब्ध माहितीनुसार, सुरूवातीच्या कलात युएस स्पॉट सोन्याच्या किमती २% पर्यंत वाढून ४६०१.१७ डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. तर अमेरिकेच्या सोन्याच्या वायदा किमती २.५% पर्यंत वाढून ४६१२.०४ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या. इतर कमोडिटीतील किंमतीने आणि औद्योगिक धातूंनीही जोरदार वाढ नोंदवली, चांदीने विक्रमी उच्चांक गाठला, तर प्लॅटिनम आणि तांबे आपापल्या उच्चांकाजवळ होते.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती ४% पेक्षा जास्त वाढल्या, याचे मुख्य कारण अमेरिका-व्हेनेझुएला तणावानंतर सुरक्षित गुंतवणुकीची मागणी हे होते. आर्थिक आकडेवारीनेही सोन्याच्या किमती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शुक्रवारी, अमेरिकन सरकारच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये बिगरशेती क्षेत्रातील रोजगारात ५०००० नोकऱ्यांची वाढ झाली, जी ६६००० वाढीच्या अपेक्षेपेक्षा कमी होती, तर बेरोजगारीचा दर ४.५% च्या अंदाजानुसार ४.४% पर्यंत खाली आला. त्यामुळे कमकुवत झालेल्या रोजगार आकडेवारीने लेबर मार्केटमध्ये घसरण होत असल्याची चिन्हे अधिक स्पष्ट केली आणि यासह युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ ते ५० बेसिस पूर्णांकाने कपात होईल अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. भारतीय सराफा बाजारात मुंबईसह इतर महत्वाच्या शहरातील सोन्याचे सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४२१५ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी १३०३० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी १०६६१ रूपयांवर पोहोचले आहेत.

चांदीच्या दरात वादळ

चांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाली आहे. आज कमोडिटी बाजारातील सत्र सुरूवातीला चांदीच्या निर्देशांकात थेट ५% वाढ झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या दरात ५% वाढ झाली आहे. त्यामुळे दरपातळी २६४१५७ रूपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपयांनी, प्रति किलो दरात थेट १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २७० रूपये, प्रति किलो दर थेट २७०००० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात दुपारी १.१३ वाजेपर्यंत ५.५१% वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति डॉलर दरपातळी ८३.६३ डॉलर प्रति औंसवर गेली आहे.

जागतिक पुरवठ्यावरील सततच्या मर्यादा आणि उद्योगधंद्यांतील वाढती चांदीची मागणी व गुंतवणुकीच्या प्रवाहाकडून वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या दरात वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात चांदी ३.८६% नी वाढून २५२७२५ पातळीवर पोहोचली होती. या तेजीमध्ये भूराजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सुरक्षित गुंतवणुकीत वाढ झाल्याचे जाणवले.व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या सहभागाचे चित्रीकरण, आणि चीन व जपानमधील वाढता तणाव यांचा समावेश आहे. यासह परवा आलेल्या युएस मॅक्रो डेटाने संमिश्रित स्थिती नमूद केली होती. घरांचे बांधकामातही युएसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ४.६% नी घसरण झाली. लेबर मार्केटमध्ये बाजारात किंचित नरमाई दिसून आल्याने घसरलेली आकडेवारी डिसेंबर २०२५ मध्ये बेरोजगारी ४.४% पर्यंत कमी झाली आणि तर वेतनवाढ ५०००० झाली होती जी अपेक्षेपेक्षा कमी होती. तज्ञांच्या माहितीनुसार ष पुरवठ्याच्या बाजूने, डिसेंबरच्या अखेरीस लंडनच्या तिजोरीतील चांदीचा साठा सुमारे २७८१८ टनांपर्यंत वाढला, तर ऑक्टोबरमध्ये ६६० टनांपेक्षा जास्त विक्रमी निर्यातीनंतर चीनमधील साठा दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला. विशेषतः चांदीच्या दरातही मोठी मागणी असल्याने नवनवे विक्रम चांदीने नोंदवला आहे.

Comments
Add Comment