पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका कायम; २३ आठवडे सलग दरवाढ, चिकन-भात सामान्यांच्या आवाक्याबाहेर

कराची : पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची कोणतीही ठोस चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक तसेच मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीनंतरही देशातील महागाईने सामान्य नागरिकांचा श्वास कोंडला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये सलग २३ आठवड्यांपासून महागाई दरात वाढ नोंदवली जात आहे.


धान्य, मांस, खाद्यतेल आणि स्वयंपाकातील अत्यावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने चढत असल्याने घरगुती बजेट कोलमडले आहे. परिणामी, अनेक कुटुंबांसाठी रोजच्या जेवणातील पदार्थ कमी होताना दिसत आहेत.



साप्ताहिक महागाई दरात अखंड वाढ


मिळालेल्या माहितीनुसार, ८ जानेवारीलाच्या आठवड्यात महागाई दरात पुन्हा वाढ झाली. गहू पीठ, तांदूळ, साखर, चिकन यांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किरकोळ दरात झालेल्या वाढीमुळे हा दर वर चढला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, दर आठवड्याला महागाईचा आलेख वरच जात असल्याचे स्पष्ट होते आहे.



या वस्तूंनी वाढवली महागाई


अलीकडील आठवड्यात गहू पीठ, चिकन, लसूण, मिरची पावडर, एलपीजी, चहा, साखर आणि बासमती तांदूळ या वस्तूंच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही वस्तूंच्या दरात वार्षिक आधारावर दहापासून तीस टक्क्यांपर्यंत उसळी पाहायला मिळत आहे. या काळात सुमारे वीसहून अधिक अत्यावश्यक वस्तू महाग झाल्या, तर काहींचे दर स्थिर राहिले.



चिकन-भात सामान्यांच्या ताटातून गायब


वाढत्या महागाईचा थेट परिणाम नागरिकांच्या जेवणावर होत आहे. अन्नपदार्थांच्या आंतरराष्ट्रीय किंमत संकेतस्थळांवरील माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये चिकनचा दर प्रति किलो सुमारे ८४० पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर तांदूळ सुमारे ३२० रुपये किलोने विकला जात आहे. दूध, अंडी, ब्रेड, भाज्या आणि फळांचे दरही लक्षणीयरीत्या वाढले असून, दैनंदिन गरजांची पुरवणे सामान्यांसाठी कठीण बनले आहे.


फळांच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही. सफरचंद, केळी आणि संत्री यांसारखी फळेही आता अनेकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. हे दर बदलू शकतात, मात्र सध्याची स्थिती महागाईचा ताण किती तीव्र आहे, हे स्पष्टपणे दाखवत आहे.एकीकडे आर्थिक मदतीचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे महागाईचा हा वाढता आलेख पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने अधिकच गंभीर करत आहे.

Comments
Add Comment

Middle East War : होर्मुजमधील इराणच्या कर वसुलीवरून ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून होर्मुज जलडमरूमध्य मार्गे होणाऱ्या तेल

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा मोठा निर्णय; इराणकडून पर्यायी समुद्री मार्ग जाहीर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या (Iran-US-Israel War) पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात एक मोठी

Iran-US-Israel War : बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा इस्त्रायलने केला दावा

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने