Sunday, January 11, 2026

'सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून मुंबईमध्ये जय श्रीराम म्हणता येणार नाही'

'सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून मुंबईमध्ये जय श्रीराम म्हणता येणार नाही'

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवडी येथील वॉर्ड क्रमांक २०५ मध्ये भाजपा-महायुतीच्या उमेदवार सौ.वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आज शिवडी रामटेकडी येथे चौकसभा पार पडली.

शिवडी आणि लालबाग हा हिंदुत्वाचा गड आहे. इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या भायखळ्यात गेल्यावर "जय श्रीराम" म्हणता येतं का ? आपण सतर्क राहिलो नाही तर १६ तारखेपासून आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला जय श्रीराम म्हणता येणार नाही.

अनेक वर्षे ठाकरे बंधूंची मुंबई पालिकेत सत्ता असताना या भागातील मराठी माणूस बाहेर का गेला ? हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. इथे मराठी माणूस टिकायलाच पाहिजे, मराठी सण-उत्सव हक्काने साजरे झालेच पाहिजेत. त्यामुळे मुंबईमध्ये हिंदुत्व आणि अस्मिता जपायची असेल तर शिवडी, लालबाग, परळ, काळाचौकीतील प्रत्येक हिंदूने आपल्या अस्तित्वासाठी १५ तारखेला मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर येऊन हिंदुत्ववादी विचारांचे नगरसेवक निवडून दिले पाहिजे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी राजेश हाटले, बबन कनावजे, गणेश शिंदे यांसह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा