संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी बोलावण्याचा निर्णय झाला आहे.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सोमवारी होणार असलेल्या बैठकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
युक्रेनने रशियावर मध्यम-पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे युक्रेनच्या सरकारकडून सांगण्यात आले. युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन आंद्री सिबिहा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केलं. तर दोन्ही देशांमधे तणाव वाढवण्यासाठी युरोप जबाबदार असल्याचा आरोप रशियानं केला आहे.
युक्रेननं रशियाच्या दक्षिणेकडील वोरोनेझ शहरावर ड्रोन हल्ले केले. यात किमान चार जण जखमी झाले आणि अनेक इमारतींचे नुकसान झालं. यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक सोमवारी बोलावण्याचा निर्णय झाला आहे.






