Sunday, January 11, 2026

मुंबईत उबाठा आणि काँग्रेसची छुपी युती?

मुंबईत उबाठा आणि काँग्रेसची छुपी युती?

एकाच टेबलवर बसवून बनवला दोन्ही पक्षांचा वचननामा

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा मनसे युती आणि काँग्रेस वंचित आघाडीच्यावतीने आपापला वचननामा जाहीर करण्यात आला आहे. परंतु या वचननाम्यांंमधील दिलेली आश्वासने ही एकाचप्रकारची असून तब्बल १८ आश्वासने ही तंतोतंत जुळत आहे. त्यामुळे या वचननाम्यातून उबाठा, मनसे तसेच काँग्रेसची छुपी आघाडी स्पष्ट होत असून एकप्रकारे एकाच टेबलवर बसून हा वचननामा बनवला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उबाठा मनसे आणि काँग्रस वंचित यांच्या वचनानाम्याचा आढावा घेतल्याने दोन्ही पक्षांचे वचननामो जवळपास समानच असून स्वतंत्र लढत असले तरी यातील काही आश्वासने एकसारखीच असल्याने त्यांची छुपी युती स्पष्ट होत आहे. या दोन्ही युती आणि आघाडीच्या वचननाम्याचा घेतलेला आढावा.

आरोग्य विभाग

काँग्रेस आणि वंचित : सर्व महापालिका रुग्णालयांमध्ये अखंड ओपीडी, तपासणीसेवा

मोफत रुग्णवाहिका सेवा वाढवणार

कोणत्याही महापालिका रुग्णालयाचे खासगीकरण केले जाणार नाही

उबाठा मनसे : महापालिका रुग्णालयांमधील ओपीडी क्षमता दुप्पट करणार

महापालिका स्वत:च्या मालकीची रुग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरु करणार

शताब्दी कांदिवली, एम.टी. अग्रवाल मुलुंड आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयांचे खासगीकरण होऊ देणार नाही

पाणी प्रश्न, जलसुरक्षा

काँग्रेस आणि वंचित : समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी डिसॅलिनेशन प्रकल्प राबवणार

पावसाचे पाणी साठवण सक्तीचे करणार व ते करणाऱ्याला विशेष सवलती देणार

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करून प्रदूषण कमी करून व किनारपट्टीचे संरक्षण करणार

उबाठा मनसे : समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करणारा नि:क्षारीकरण डिसॅलिनेशन प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार

नवीन इमारतींमध्ये रेनवॉटर परकोलेशन पिट्स आणि मुंबईत काही ठराविक जागी रेन वॉटर होल्डींग टँक्स साकारणार

सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मल:निसारण प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

शिक्षण

काँग्रेस आणि वंचित : सर्व महापालिका शाळांमध्ये संगणक वर्ग, स्मार्ट क्लासरुम व एआय आधारीत वर्ग सुरु करणार

पोष्टिक मध्यान्ह भोजन, नियमित आरोग्य तपासणी

ई लायब्ररी व ई बूक सुविधा उपलब्ध करणार

उबाठा आणि मनसे : प्रत्येक शाळेत व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिएॅलिटी तसेच आर्टीफिशिल इंटेलिजन्सचा वापर करून विद्यार्थ्यांना नव्या जगतील नव्या शैक्षणिक आव्हानांसाठी सज्ज करणार

शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा फिटनेस आणि पोषक अर्थात शाकाहारी व मांसाहारी अंडे अशाप्रकारे आहारावर लक्ष देणार

महापालिकेची वाचनालयंही अत्याधुनिक आणि डिजिटल केले जातील

कचरा, स्वच्छ मुंबई, कचरा व्यवस्थापन

काँग्रेस आणि वंचित : डम्पिंग ग्राऊंडवरील जुना साठवलेला कचरा हटवून कचऱ्याची १०० टक्के वैज्ञानिक विल्हेवाट लावणार

रस्ते व पदपथाची दररोज स्वच्छता तसेच व्हॅक्युमने रस्ते झाडणार

उबाठा आणि मनसे : पुढील दहा वर्षांत कांजूरमार्ग कचराभूमी बंद करून महापालिकेच्या २४ विभागांत स्थानिक पातळीवर कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र उभारली जाईल

मुंबईकरांची जीवनशैली आणि वाहतुकीची रहदारी पाहता रात्रीच्या वेळची यांत्रिकी सफाई मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येईल .

अपघात मुक्त मुंबई, रस्ते

काँग्रेस आणि वंचित : मुंबई शहराला खड्डेमुक्त करणार, मुंबईतील सर्व प्रमुख व उपरस्त्यांचे काँक्रिटीकरण करणार . निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करणार

उबाठा आणि मनसे : मुंबईत उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील, रस्त्यावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे खड्डे पडल्यास त्यांच्याकडून जबदर दंड वसूल केला जाईल

विरंगुळा पार्क मोकळ्या जागा

काँग्रेस आणि वंचित : प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये एक आधुनिक क्रीडा संकुल उभारणार

उबाठा आणि मनसे : प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारणार

बेस्ट उपक्रम

काँग्रेस आणि वंचित : बेस्टचा बस ताफा ६ हजार पर्यंत वाढवून सार्वजनिक वाहतूक अधिक मजबूत

उबाठा आणि मनसे : बेस्टच्या तफ्यात १० हजार इलेक्ट्रीक बस तसेच ९०० डबल डेकर इलेक्ट्रीक बसचा समावेश

स्मशानभूमी

काँग्रेस आणि वंचित : परंपरेचा सन्मा राखत, प्रशासनात संवेदनशीलतेतसह सन्मान प्रतिष्ठा सुनिश्चित करणार, लोकसंख्येच्या गरजेनुसार नवीन सुविधा विकसित करणार, आधुनिक विद्युत दाहिनी प्रणाली सुरु करणार

उबाठा आणि मनसे : हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिश्चन दफनभूमी तसेच इतर धर्मीयांच्या स्मशानभूमीत शाश्वत आणि आवश्यक त्यांचा विकास आणि विकास करणार

कोळीवाडे

काँग्रेस आणि वंचित : कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण आखणार

उबाठा आणि मनसे : गावठाण कोळीवाड्यातील बांधकाम नियमित केली जातील

महिला सक्षमीकरण

काँग्रेस आणि वंचित : काम करणाऱ्या महिलांसाठी डे केअर केंद्र उभारणार

सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन्स उपलब्ध करून देणार

उबाठा आणि मनसे : नोकरदार पालक आणि कष्टकरी महिला यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणाघरे सुरु करणार

स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन पॅड व्हेंडींग मशिन्स असतील

Comments
Add Comment