Sunday, January 11, 2026

गेल्या चार वर्षांपासून ओटीटीवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे 'ही' वेब सीरीज.

गेल्या चार वर्षांपासून ओटीटीवर नंबर 1 वर ट्रेंड करत आहे 'ही' वेब सीरीज.

Wednesday : चित्रपटांसोबत आता ओटीटी हे मनोरंजनाचं माध्यम बनलं आहे. सध्या ओटीटी वर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज, चित्रपट हे रिलीज होत आहे. ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळी याप्रकारचे जॉनर बघायला मिळतात, ज्यामध्ये हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर, कॉमेडी असे सर्व चित्रपट एकाच ठिकाणी बघायला मिळत असल्याने याचा प्रेक्षकांना भरपूर फायदा होत आहे. त्यामुळे ओटीटीवरील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

वेडनेसडे ही सीरीजने १६ एपिसोड आणि आतापर्यंत मिळाले ४०० मिलियन व्ह्यूज. ही सीरीज हॉरर आणि अनेक रहस्यांनी भरलेली असून आजही प्रेक्षक ती वारंवार पाहत आहेत. याच लोकप्रियतेमुळे ही सीरीज आजही ओटीटीवर ट्रेंड करत आहे. या सीरीजमध्ये अभिनेत्री जेना ऑर्टेगा हिने वेडनेसडेची प्रमुख भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं. तिच्यासोबतच एम्मा मायर्स, हंटर डूहन, जॉय संडे आणि कॅथरिन झेटा-जोन्स यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

वेडनेसडे’चा पहिला सीझन नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या पहिल्या सीझनमध्ये एकूण ८ एपिसोड आहेत.पहिल्या सीझननंतर तब्बल तीन वर्षांनी ‘वेडनेसडे’चा दुसरा सीझन ऑगस्ट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला. हा सीझन स्टॅगर्ड फॉरमॅटमध्ये रिलीज करण्यात आला होता. दुसऱ्या सीझनमध्येही एकूण ८ एपिसोड आहेत. यापैकी उर्वरित चार एपिसोड सप्टेंबर २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले.

या सीरीजची निर्मिती अल्फ्रेड गफ आणि माइल्स मिलर यांनी केली आहे. तर प्रसिद्ध कार्टूनिस्ट चार्ल्स अ‍ॅडम्स यांच्या ‘वेडनेसडे’ या पात्रावर ही कथा आधारित आहे. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. विशेष म्हणजे पहिल्या सीझनमधील चार एपिसोड्सचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक टिम बर्टन यांनी केलं होतं.

IMDb रेटिंग आणि लोकप्रियता

‘वेडनेसडे’ या सीरीजला IMDB वर १०पैकी ८रेटिंग मिळाली आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरीज हिंदी डबिंग आणि सबटायटल्ससह उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांपासून ही सीरीज सतत ट्रेंड करत असून आतापर्यंत तिला ३७१ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Comments
Add Comment