प्रतिनिधी: एकीकडे भारत व युएस यांच्यातील संबंधावर मोठा दावा युएस वाणिज्य विभागाचे सचिव हावर्ड लुटनिक यांनी केल्यानंतर त्यांचा संपूर्ण दावा काल पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी खोडून काढला. आम्ही असहमत असून संपूर्ण दावा नाकारत असून यामध्ये तथ्य नसल्याचे जैसवाल यांनी स्पष्ट केले. हावर्ड लुटनिक यांनी एका पोडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संवाद साधण्याचे टाळले असल्याचे म्हटले होते.यावर भाष्य करताना, किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पीएम मोदी यांनी ७ ते ८ वेळा फोनवर संवाद साधला असल्याचे जैसवाल म्हणाले आहेत.
दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असा व्यापारी करार करण्याची भारताची भूमिका आहे. भारताच्या बाजूनेही गेल्या फेब्रुवारीपासून अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा लुटनिक यांचा दावा चुकीचा आहे. भारतानेही अनेकदा सामंजस्याची भूमिका घेत बोलणी केली होती. त्यामुळे अनेकदा हा व्यापारी करार पूर्ण होईल अशी आशा निर्माण झाली होती. अद्याप यावर तोडगा निघाला नसला तरी युएसकडून केलेल्या गेलेल्या दाव्यात तथ्यता नाही. दरम्यान लुटनिक यांनी एका पोडकास्ट कार्यक्रमात ट्रम्प यांना कराराबाबत मोदीशी संवाद साधायचा होता परंतु मोदींनी संवाद साधला नाही. मोदी फोन करण्यात व उचलण्यास उत्सुक नव्हते असा धक्कादायक दावा लुटनिक यांनी केला होता. यापूर्वी या आठवड्याच्या सुरुवातीला लिंडसे ग्रॅहम यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरून भारतावर ५००% टॅरिफ लावण्याचे सूचित केले होते. जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानातील युद्ध माझ्या सांगण्यावरून थांबले या दाव्यांंनंतर दोन्ही देशातील कटुता आणखी वाढली असल्याचे सांगितले जाते.






