मुंबई : अभिनेत्री तारा सुतारीया आणि वीर पहारिया हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे कपल एकमेकांना वर्षभरापासून डेट करत असून तारा आणि वीर हे लाखो चाहत्यांचे आवडते कपल आहे. काही महिन्यांपूर्वीच आपलं नातं त्यांनी जगजाहीर केलं असला तरी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत.
नेमकं घडला काय?
एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमूळे वाद
काही महिन्यांपूर्वीच तारा आणि वीर मुंबईमध्ये एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमहद एकत्र दिसले होते. याच कॉन्सर्ट दरम्यान एपी याने ताराला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचण्ड व्हायरल झाला. विशेष म्हणेज त्या व्हिडीओ यामध्ये वीर ही त्यावेळी उपस्थित असताना दिसत होता, आणि त्याने दिलेल्या प्रतिक्रिया या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला. आणि याच व्हायरल व्हिडीओनंतर त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. चाहत्यांमध्ये रंगली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ताराने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत, " खोट्या अफवा, चुकीचं एडिटिंग आणि पैशासाठी केलेली पीआर आम्हाला हादरवू शकत नाही. शेवटी प्रेम आणि सत्याचाच विजय होतो, "असं म्हटलं होत. तर वीरनेही आपली प्रतिक्रिया देत, व्हायरल झालेली रिऍक्शन 'थोडी सी दारू' या गाण्यावर नसून दुसऱ्या गाण्यावर होता, असं स्पष्ट केल होत.
मात्र एक मुलाखतीत तारा आणि वीर यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेकअपमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही. दोघांपैकी कुणीही या कथित ब्रेकअपवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही






