Sunday, January 11, 2026

सुझुकीने लाँच केली इलेट्रीक स्कूटर e-Access, किती आहे किंमत ?

सुझुकीने लाँच केली इलेट्रीक स्कूटर e-Access, किती आहे किंमत ?

नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची वाढलेली क्रेझ पाहून जपानची दिग्गज कंपनी सुझुकीने इलेक्ट्रिक स्कूटर 'Suzuli e-Acess' भारतात लाँच केली आहे.

सुझुकीने ओला नाही तर किमान बजाज चेतक, टीव्हीएस आयक्यूब, एथर, हिरो होंडा यासारख्या कंपन्यांच्या स्कूटरची किंमती सारखी किंमत ठेवायला हवी होती, परंतु त्यांनी तसे केले नाही. यामुळे ९५ किमीच्या रेंजसाठी कितीजण दोन लाख रुपये मोजणार हे लवकरच समजणार आहे.

सुझुकी ई अॅक्सेस या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १. ८८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या स्कूटरसोबत कंपनीने तब्बल ७ वर्षाची वॉरंटी आणि बाय-बॅक गॅरेंटी देऊन ग्राहकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. सुझुकी e-Access ही भारतातील अशा मोजक्या स्कूटर्सपैकी एक आहे, ज्यामध्ये ३ kwh क्षमतेची LEP बॅटरी वापरण्यात आली आहे. सामान्य NMC बॅटरीच्या तुलनेत LEP बॅटरीचे आयुष्य जास्त असते आणि ती अधिक सुरक्षित मानली जाते.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स

१ रेंज : सिंगल चार्जमध्ये ९५ किमी धावण्याचा दावा. २ इंजिन आणि टॉर्क : ४. kW ची मोटार आणि १५ Nm टॉर्क. ज्यामुळे शहरात चालावताना उत्तम पिकअप मिळेल. ३ रायडींग मोड्स : इको, राईड A आणि राईड B असे तीन मोडस. त्यासोबत रिव्हर्स असिस्ट आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ४ मेंटनन्स-फ्री बेल्ट ड्राइव्ह : यामध्ये ७०,००० किमी किंवा ७ वर्षापर्यंत देखभाल करण्याची गरज नसलेला ड्राइव्ह दिला आहे.

Comments
Add Comment