मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत चांदीने आज धुमाकूळ घातला आहे. एका सत्रात चांदी थेट ११००० रुपये प्रति तोळा दराने उसळली आहे.'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, आज चांदीने नव्या उच्चांकावर घौडदौड सुरु ठेवली आहे. कारण चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ११ रूपयांनी वाढ झाल्याने दरपातळी २६० रूपये, प्रति किलो दरात ११००० रूपयांनी वाढ झाल्याने चांदी प्रति किलो दरपातळी २६०००० रुपयांवर पोहोचली आहे. आज एकूणच सकाळच्या सत्रापासूनच चांदीच्या दरात तुफान वाढ झाली आहे. युएस बाजारासह जागतिक स्तरावर चांदीचे हेजिंग वाढले. भूराजकीय कारणांसह नुकत्याच झालेल्या घडामोडीत ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा इशारा दिल्याने बाजारात खळबळ उडाली होती. याशिवाय युएस व्हेनेझुएला यांच्यातील अस्थिरता, नवीन युएसची आलेली रोजगार आकडेवारी व त्यातून बाजारात दरकपातीची आश्वासकता यामुळे चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे औद्योगिक उत्पादनातील मागणीसह ईटीएफ गुंतवणूकीची व फ्युचर मागणीत वाढ झाल्याने चांदीला आज महत्व प्राप्त झाले. दुसरीकडे युएसने चांदीला मौल्यवान धातूचा दर्जा दिला असताना गुंतवणूकदारांनी सोन्याचांदीच्या सुरक्षित गुंतवणूकीत वाढ सुरू केली आहे.
परवाच्या जागतिक नफा बुकिंग नंतर चांदीचे दर उसळले होते ते सत्र सुरू राहिल्याने आजही ११००० रूपयांनी वाढ झाली आहे. परवा ८००० रुपयांनी घसरलेली चांदी सध्या तेजीच्या पॅटर्नवर गेली असल्याचे यातून स्पष्ट होते. आज एक दिवसात चांदी ६% उसळली असून लवकरच तीन लाखांचा आकडा चांदी पार करेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या १० दिवसात चांदी ९.२४% उसळली असून सोने ४% उसळले आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २६००, प्रति किलो २६००० रुपयांनी कायम आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मधील चांदीच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.२९% घसरण झाली आहे. त्यामुळे दरपातळी २५२००२ रूपयावर व्यवहार करत आहे.
चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असताना मागणी सातत्याने वाढत आहे ज्यामुळे मार्च महिन्याच्या चांदीच्या वायदा (Futures) करारांमध्ये प्रति किलोग्राम ७४७६ रुपयांची, म्हणजेच ३.५०% ची वाढ होऊन, भाव २.६० लाख रुपयांचा टप्पा ओलांडून २६०००० रुपयांवर पोहोचले आहेत. एकूणच या आठवड्यात, एमसीएक्सवरील चांदीच्या दरात प्रति किलोग्राम जवळपास १४५१० रुपयांची वाढ झाली असून आतापर्यंत महिन्याभरात १५१०१ रुपयांची वाढ झाली आहे.






