Saturday, January 10, 2026

'प्रहार' शनिवार Exclusive Market Outlook: बाजारात 'कंसोलिडेशनची' फेज सोमवार मंगळवारी सुरूच राहणार! प्रहारशी बोलताना तज्ञांची 'इनसाईड' स्टोरी

'प्रहार' शनिवार Exclusive Market Outlook: बाजारात 'कंसोलिडेशनची' फेज सोमवार मंगळवारी सुरूच राहणार! प्रहारशी बोलताना तज्ञांची 'इनसाईड' स्टोरी

मोहित सोमण: एकूणच शेअर बाजार या आठवड्यातील अतिशम अस्थिर होते. काल सलग नवव्या सत्रात घसरल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. आकडेवारीतच सांगायचे झाल्यास ४ दिवसात शेअर बाजार ४% कोसळल्याने तब्बल ९.९१ लाख कोटी रुपये पाण्यात गेले होते. अंतिमतः रिटेल गुंतवणूकदारांसह संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही यांचा फटका बसला होता. असे असताना युएस कडून मोठ्या हालचाली सुरु असताना पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी कसा राहिल हे पाहणेही महत्वाचे असेल.

काल डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्का(Tariff) विरोधातील याचिकेवर न्यायालयाची सुनावणी सुरू होती. ज्याचा अंतिम निकाल भारतीय वेळेनुसार काल रात्री अपेक्षित होता.मात्र काही कारणास्तव हा निकाल १४ तारखेवर पुढे ढकलला असल्याने पुन्हा बाजारातील रॅलीची आशा बाजाराने धुडकावून लावली असून पुन्हा एकदा बाजारात किरकोळ मंदीचे संकेत मिळत आहेत. निश्चितच मोठ्या प्रमाणात बाजार कोसळणार नसून बाजार हा कंसोलिडेशन फेज मध्ये कायम राहणार आहे असे तज्ञांनी म्हटले. प्रहारला प्रतिक्रिया देताना अजित भिडे यांनी,' बाजारात पुढील दोन दिवस कंसोलिडेशन अपेक्षित आहे. बाजारात निश्चितच रॅली नसली तरी अतिशय पडझड होणार नाही. बाजार सपाट (Flat) अथवा किरकोळ घसरणीकडे झुकेल अशी चिन्हे दर्शवत आहेत. अर्थातच पुढील घडामोडीचा बाजारात परिणाम होणार असला तरी अद्याप बाजारात गुंतवणूकदार बारकाईने सगळ्या घटना भूराजकीय घडामोडीचा आढावा घेतील.' असे म्हटले.

नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला निर्वाणीचा इशारा दिला आहे. खरं तर डेन्मार्क प्रशासनाचा अंतर्गत येणाऱ्या छोट्या बेटाला (ग्रीनलँड) ला डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा देत त्यांना आवडो अथवा न आवडो आम्ही आमच्या पद्धतीने पुढे कार्यवाही करणार असे म्हटल्याने मोठ्या प्रमाणात बाजारातही साशंकता निर्माण झालेली आहे. याविषयी आम्ही अजित भिडे यांना विचारले असताना,' शेअर बाजारात याचा फारसा परिणाम होणार नाही. ग्रीनलँडचा विषय व्यापक आहे. निश्चितच भावनिकदृष्ट्या तो विषय व्यापक असला तरी प्रत्यक्षात ग्रीनलँड राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांनाही सूचक प्रत्युत्तर दिले होते. जर ट्रम्प यांनी हल्ला केला तर आम्ही संपूर्ण युरोप देश नाटोमधून बाहेर पडू असे म्हटले होते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या लगेच ग्रीनलँडवर हल्ला करणे ट्रम्प यांना परवडणार नाही. सध्या अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीही बिकट आहे ते पाहता लगेच ते धारिष्ट्य ट्रम्प दाखवतील का हे पाहणे क्रमप्राप्त असेल.'असे म्हटले.

दरम्यान काल उशीरा युएस बाजारातील नॉन पेरोल रोजगार आकडेवारी जाहीर झाली. अपेक्षेहूनही कमी प्रमाणात रोजगारनिर्मिती युएस बाजारात झाली आहे. ५०००० रोजगार युएस बाजारात निर्माण झाले असले तरी यंदा युएस मधील महाग अनपेक्षितपणे २.४% आली होती. या आशावादामुळे युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीशी शाश्वती निर्माण झाली आहे. गुंतवणूकदारांनी यावर लक्ष केंद्रित केले असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात टेक शेअर्समध्ये व कमोडिटी बाजारातील निर्देशांकात दिसत आहे. याविषयी विचारले असता ज्येष्ठ बाजार विश्लेषक अजित भिडे म्हणाले आहेत की,' निश्चितच याचा परिणाम अपेक्षित असला तरी त्याचा फारसा परिणाम भारतावर अपेक्षित नाही. बाजार केवळ बॉटमवर असल्याने ते तसेच राहिल का बॉटम आऊट होते का इतकेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.मुळात बाजारात जितकी मंदी व टॅरिफचा परिणाम अपेक्षित होता तो झाला. त्यामुळे या आकडेवारीचा प्रचंड परिणाम होईल असे दिसत नाही. अर्थातच गुंतवणूकदारांना १४ तारखेच्या निकालाची वाट पहावी लागेल तो पर्यंत बाजार किरकोळ घसरणीत किंवा सपाट पातळीवर दिसेल. गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीची स्ट्रेटेजी काय ठेवावी यावर विचारले असताना गुंतवणूकदारांनी वेट अँड वॉचचीच भूमिका सध्यातरी आत्मसात करावी. जोखीम टाळून घडामोडीकडे लक्ष केंद्रित करावे. दरम्यान एखाद्या समभागाचे (Stock) व्हॅल्युऐशन आकर्षक वाटल्यासच बाय बाय ऑन डीप्स रणनीती आत्मसात करावी असे वाटते.' असे म्हटले.

गेल्या संपूर्ण आठवड्यात घसरण अधिक प्रमाणात झाल्याने बाजारातील फंडा मेंटल कोलमडले होते. या आठवड्यात सेन्सेक्स २.३४% अंकाने घसरला असून निफ्टी २.३९% कोसळला आहे.संपूर्ण डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स ०.९७% कोसळला असून निफ्टी ५० हा ०.२६% कोसळला. घसरणीचा पाढा गिरवत सेन्सेक्स बँक निर्देशांकात आठवड्यात १.४५% घसरण झाली असून गेल्या महिनाभरात मात्र सेन्सेक्स बँक ०.६४% उसळला होता. बँक निफ्टी बाबतीत, गेल्या आठवड्यात निर्देशांक १.८१% कोसळला असून गेल्या महिनाभरात मात्र ०.५१% उसळला आहे.

मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडच्या ग्लोबल मार्केट स्नॅपशॉट अहवालानुसार, निफ्टी ५०० डिसेंबरमध्ये स्थिर राहिला, परंतु वर्षाचा शेवट +६.७% वाढीसह झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या महिन्यात किंचित नकारात्मक राहिले, ज्यात सुमारे ०.२% ते ०.५% घट झाली. गेल्या एका महिन्यात निफ्टी ५० मध्ये ०.२८% घट झाली. या निर्देशांकाने तीन महिन्यांत ६.१७%, सहा महिन्यांत २.४०% आणि एका वर्षाच्या कालावधीत १०.५१% परतावा दिला. निफ्टी नेक्स्ट ५० ने मासिक ०.३३% वाढ नोंदवली. या निर्देशांकाने तीन महिन्यांत २.२४%, सहा महिन्यांत ०.५३% आणि एका वर्षात २.०२% परतावा नोंदवला. निफ्टी मिडकॅप १५० मध्ये एका महिन्यात ०.५३% घट झाली आणि गेल्या तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षाच्या कालावधीत या निर्देशांकाने अनुक्रमे ५.८९%, १.३१% आणि ५.३७% परतावा दिला. निफ्टी स्मॉलकॅप २५० मध्ये या महिन्यात ०.२९% घट झाली. या निर्देशांकात तीन महिन्यांत ०.०५% घट झाली, तर सहा महिन्यांत परतावा -६.२५% आणि एका वर्षाच्या कालावधीत -६.०१% राहिला. निफ्टी मायक्रोकॅप २५० मध्ये गेल्या एका महिन्यात २.४६% घट झाली आणि तीन महिन्यांत -१.४९%, सहा महिन्यांत -६.८३% आणि एका वर्षात -९.९५% परतावा दिला. निफ्टी ५०० मध्ये मासिक ०.२६% घट झाली आणि गेल्या तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षाच्या कालावधीत या निर्देशांकाने अनुक्रमे ५.००%, १.०८% आणि ६.६९% परतावा दिला आहे.

विविध क्षेत्रांमध्ये, धातू क्षेत्राने महिन्यात ८.५% ची वाढ नोंदवली, तर तीन महिन्यांत ११.२५%, सहा महिन्यांत १७.१३% आणि एका वर्षाच्या कालावधीत २९.११% परतावा दिला. ऑटो क्षेत्राची गेल्या एका महिन्यात १.४९% वाढ झाली आणि तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षाच्या कालावधीत या क्षेत्राकडून अनुक्रमे ६.२१%, १८.०८% आणि २३.४५% परतावा मिळाला.बँकिंग क्षेत्राकडून तीन महिन्यांत ९.०५%, सहा महिन्यांत ३.९६% आणि एका वर्षात १७.१५% परतावा मिळाला. आयटी क्षेत्रात किरकोळ वाढ झाली. ग्राहक टिकाऊ वस्तू, आरोग्यसेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात डिसेंबरमध्ये सुमारे २% ते ३% घट झाली. संरक्षण क्षेत्रात गेल्या एका महिन्यात ३.२८% घट झाली, तथापि एका वर्षाच्या कालावधीत १९.३०% वाढ झाली. स्थावर मालमत्ता क्षेत्रात एका महिन्यात २.७९% आणि एका वर्षाच्या कालावधीत -१६.५७% घट झाली.'

काल अस्थिरता निर्देशांक ३.११% कोसळला असताना काल भारत अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index VIX) हा गेल्या आठवड्यात १५.९८% उसळला होता तर गेल्या एक महिन्यात ०.४८% उसळला होता. याचाच अर्थ गेल्या महिन्यापेक्षाही या महिन्यात अधिक अस्थिरता कायम राहिली आहे. अपवाद म्हणून आयटी शेअर्समध्ये चांगली कामगिरी झाल्याने काल आयटी शेअर ०.२८% उसळले असले तरी गेल्या आठवड्यात आयटी कंपनीच्या ०.४१% घसरण झाली आहे. तर महिन्यात मात्र ०.३७% वाढ झाली आहे. रिलायन्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टीसीएस कंपन्यांनी संपूर्ण आठवड्यात खराब कामगिरी बाजारात केली. दरम्यान आयसीआयसीआय बँक, एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज ऑटो या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे काही प्रमाणातील बाजारातील आणखी घसरण रोखली गेली. एकूणच बाजारातील कंसोलिडेशन फेज या आठवड्यात चालू राहिली. प्रकर्षाने मिड व स्मॉल कॅप मध्ये सेलिंग अधिक झाले असताना परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या लार्जकॅपमधून काढून घेतल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले होते. एकूणच यावेळी बाजार मोठ्या प्रमाणात अस्थिर होता.

याविषयी प्रहारशी संवाद साधताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक रिसर्च विश्लेषक नंदीश शहा काय म्हणाले वाचा...

या पार्श्वभूमीवर, तुम्ही आगामी आठवड्यासाठी बाजाराच्या वर्तनाचे मूल्यांकन कसे कराल? या टप्प्यावर गुंतवणूकदारांसाठी तुम्ही कोणता दृष्टिकोन सुचवाल: सावधगिरी बाळगणे, निवडक गुंतवणूक करणे, की प्रतीक्षा करा आणि पहा (वेट-अँड-वॉच) धोरण अवलंबणे योग्य ठरेल असे विचारले असता,' या महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी उच्चांक (२६३७३) गाठल्यानंतर, जागतिक भूराजकीय परिस्थितीत झालेल्या नाट्यमय बदलांमुळे निफ्टी करेक्शनच्या टप्प्यात दाखल झाला आहे. शिवाय, भारतीय बाजार जागतिक बाजारांच्या तुलनेत कमी कामगिरी करत आहेत, त्यामुळे भूराजकीय अनिश्चितता वाढल्यास किंवा येथून पुढे रुपयामध्ये मोठी घसरण झाल्यास त्यांच्यावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या, भारतीय बाजारपेठा अमेरिके-व्हेनेझुएला संकट आणि मध्यपूर्वेतील अनिश्चितता यांसारख्या जागतिक तणावामुळे निर्माण झालेल्या उच्च अस्थिरतेच्या जटिल परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहेत, तसेच यूएस फेडच्या व्याजदर निर्णयांचीही अपेक्षा आहे.

पुढील आठवड्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्थानिक घटक म्हणजे आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या टीसीएस आणि एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, विप्रो आणि बँकिंग क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार आहेत. आगामी निकाल हंगाम निफ्टी २५९००-२६००० पातळीची आधार पातळी (Support Level) टिकवून ठेवू शकतो की नाही आणि सर्वकालीन उच्चांकाकडे वाटचाल करेल की नाही हे ठरवेल.' असे म्हणाले

तांत्रिकदृष्ट्या काय गुंतवणूकदारांसाठी महत्वाची रणनीती असेल? हे विचारले असता,' तांत्रिक दृष्टिकोनातून, अल्प मुदतीच्या नरमाई असूनही, दैनंदिन आलेखांवरील (Daily Chart) उच्च शिखर (Top) आणि उच्च तळ (Bottom) यांच्या पॅटर्नमुळे व्यापक स्थितीगत कल तेजीचा राहिला आहे. वरच्या बाजूने (Upside) २६३७३ पातळीचा अलीकडील उच्चांक तात्काळ प्रतिकार (Immediate Resistance) पातळी म्हणून काम करण्याची शक्यता आहे,तर २५९००-२६००० पातळीचा पट्टा मजबूत अल्प मुदतीचा आधार देईल अशी अपेक्षा आहे, जिथे आम्हाला पुट रायटिंग दिसून आले आहे. शिवाय, ही पातळी २५९२० पातळीच्या आसपास असलेल्या ५० दिवसांच्या ईएमए (50 day Exponential Moving Average EMA) शी जुळते. २५९०० पातळीच्या खाली कोणताही क्लोज २५७०० पातळीच्या पातळीसाठी दरवाजे उघडेल.

जागतिक लष्करी तणाव आणि कमाईच्या हंगामाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर, 'निवडक गुंतवणूक' हा दृष्टिकोन सर्वात योग्य आहे. देशांतर्गत कमाईची दृश्यमानता आणि बचावात्मक गुणधर्म असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे हा एक विवेकपूर्ण दृष्टिकोन आहे.

या पार्श्वभूमीवर, तुम्ही पुढील आठवड्यासाठी बाजाराच्या वर्तनाचे मूल्यांकन कसे करता? हे विचारले असता या टप्प्यावर तुम्ही गुंतवणूकदारांसाठी कोणता दृष्टिकोन सुचवाल: सावधगिरी बाळगणे, निवडक गुंतवणूक करणे, की प्रतीक्षा करा आणि पहा (वेट-अँड-वॉच) धोरण अवलंबणे? यावर उत्तर देताना नंदीश शहा म्हणाले आहेत की,' या महिन्याच्या सुरुवातीला २६३७३ पातळीच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्यानंतर, निफ्टीने लक्षणीय करेक्शनच्या काळात प्रवेश केला आहे. ही घसरण मोठ्या प्रमाणात जागतिक भूराजकारणातील मोठ्या बदलामुळे झाली आहे, ज्यामुळे भारतीय इक्विटीज नाजूक स्थितीत आहेत कारण त्यांची कामगिरी त्यांच्या जागतिक समकक्षांपेक्षा कमी आहे. नवीन आठवडा सुरू होत असताना, भारतीय बाजारपेठा उच्च अस्थिरतेच्या वातावरणातून मार्गक्रमण करत आहेत. हा गोंधळ सध्याच्या जागतिक तणावामुळे वाढला आहे, तसेच आगामी यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयांबद्दल गुंतवणूकदारांच्या चिंतेमुळे तो अधिकच वाढला आहे. भूराजकीय जोखमीत कोणतीही पुढील वाढ किंवा येथून रुपयाचे तीव्र अवमूल्यन झाल्यास देशांतर्गत निर्देशांकांवर त्याचा विषम परिणाम होऊ शकतो.

जरी जागतिक मॅक्रो घटक प्रतिकूल असले तरी, आगामी आठवड्यासाठी सर्वात महत्त्वाचा देशांतर्गत उत्प्रेरक म्हणजे आर्थिक वर्ष २६ वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या हंगामाची सुरुवात. बाजाराची प्रमुख आधार पातळी टिकवून ठेवण्याची क्षमता मोठ्या कंपन्यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.या आठवड्यात टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि विप्रो यांसारख्या आयटी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे, तसेच एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या प्रमुख बँकांचे निकाल जाहीर होतील. हे आगामी कमाईचे चक्रच हे निश्चित करेल की निफ्टी स्थिरावून पुन्हा सर्वकालीन उच्चांकाकडे वाटचाल करू शकेल की तो विक्रीच्या तीव्र दबावाला बळी पडेल.

तांत्रिक दृष्टिकोनातून, अलीकडील मंदी असूनही, व्यापक पोझिशनल ट्रेंड संरचनात्मकदृष्ट्या तेजीचाच आहे. २६३७३ चा अलीकडील उच्चांक कोणत्याही सुधारणेच्या प्रयत्नासाठी तात्काळ अडथळा म्हणून काम करेल. खालच्या बाजूला २५७००-२५९०० पातळीचा पट्टा नजीकच्या काळात मजबूत आधार देईल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्राला महत्त्वपूर्ण पुट रायटिंग आणि ५०-दिवसांच्या एक्सपोनेंशियल मूव्हिंग ॲव्हरेज (EMA) द्वारे बळकटी मिळाली आहे, जे सध्या २५९२० पातळीच्या पातळीजवळ आहे. २५७०० पातळीच्या खाली निर्णायक बंद झाल्यास सध्याचा तेजीचा कल रद्द होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे २५३००-२५५०० पातळीच्या पातळीकडे घसरण होण्याचा मार्ग मोकळा होईल.

सध्याची भूराजकीय अनिश्चितता आणि कमाईच्या हंगामातील अंतर्निहित अस्थिरता पाहता, आम्हाला वाटते की 'निवडक गुंतवणुकीचा' दृष्टिकोन सर्वात योग्य आहे. बाजारातील व्यापक गतीचा पाठलाग करण्याऐवजी, या टप्प्यावर देशांतर्गत कमाईची उच्च दृश्यमानता आणि अंगभूत बचावात्मक गुणधर्म असलेल्या क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित करणे ही एक विवेकपूर्ण रणनीती आहे. गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून, गुंतवणूकदार सध्याच्या भूराजकीय वादळाचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतात, तसेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन संरचनात्मक वाढीसाठी सज्ज राहू शकतात.' असे म्हटले.

बाजारील चित्राबाबत प्रतिक्रिया देताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय इक्विटी बाजाराने २०२६ च्या पहिल्या पूर्ण आठवड्यात सावधगिरीने व्यवहार केला, जो बाजारातील सुधारणेचा कल दर्शवतो. आठवड्याची सुरुवात संथ गतीने झाली, कारण वाढीव सरकारी कर्ज घेण्याच्या अपेक्षांमुळे बाँडवरील उत्पन्न वाढले, तरीही मजबूत जीएसटी संकलन आणि बँकांच्या कर्जातील निरोगी वाढीने काही प्रमाणात आधार दिला. तथापि, व्हेनेझुएला-अमेरिका यांच्यातील तणाव, रशियन तेल आयातीबद्दलची चिंता, चीनने दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर घातलेले निर्बंध आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) सुरू असलेला निधीचा बहिर्वाह यांसारख्या जागतिक प्रतिकूल परिस्थितीमुळे बाजारातील भावना कमकुवत झाली. ऑटो, धातू आणि तेल व वायू क्षेत्रातील नफावसुलीमुळे निर्देशांकांवर दबाव आला, तर मागणी पुनरुज्जीवनाच्या आशेने ग्राहक टिकाऊ वस्तूंच्या क्षेत्रातील निवडक खरेदीने काहीसा दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शुल्कावरील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आठवडा सावधगिरीच्या वातावरणात संपला, आणि रशियावरील निर्बंधांखालील अतिरिक्त करांच्या भीतीमुळे कमाईच्या पुनर्प्राप्तीबद्दलच्या आशावादावर सावट आले.

पुढच्या काळात, जागतिक व्यापार गतिशीलता आणि तिसऱ्या तिमाहीच्या कमाईबद्दलची स्पष्टता बाजाराची दिशा ठरवेल. नजीकच्या काळात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे, विशेषतः अमेरिकेशी संबंधित कंपन्या आणि धातू व तेल-वायू यांसारख्या क्षेत्रांमध्ये. तथापि, मजबूत देशांतर्गत मूलभूत घटक, लवचिक जीडीपी वाढ आणि मजबूत पतपुरवठ्याचे कल, जिथे कमाईची शक्यता अनुकूल आहे अशा ठिकाणी निवडक खरेदीला आधार देऊ शकतात.परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा प्रवाह आणि चलनातील चढ-उतार हे महत्त्वाचे निरीक्षण घटक असतील, तर भारत-अमेरिका व्यापार चर्चेतून कोणताही सकारात्मक परिणाम किंवा शुल्कासंबंधीची चिंता कमी झाल्यास अल्प-मुदतीची तेजी येऊ शकते. एकूणच, बाह्य धोके आणि देशांतर्गत मूलभूत घटकांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत, बाजार संमिश्र कलानिशी मर्यादित कक्षेत राहण्याची अपेक्षा आहे.'

त्यामुळे एकूणच सावधगिरी बाळगणे हा पर्याय पुढील आठवड्यातील सुरूवातीला महत्वाचा ठरेल असे दिसते. तसेच बाय ऑन डिप्स ही रणनीती सुद्धा काही प्रमाणात अपवादात्मक स्थितीत कामी येऊ शकते असे म्हटले जात आहे. विशेषतः आपल्या पोर्टफोलिओत नवी खरेदी करताना अधिक जोखीम बाळगणे गरजेचे आहे. तिमाही निकालानंतर विशेषतः घसरण झाल्यास गुंतवणूकदारांसाठी नफा बुकिंगसाठी चांगली संधी कंसोलिडेशन स्थितीत पोहोचलेले बाजार देऊ शकते.

Comments
Add Comment