Sunday, January 11, 2026

Mumbai Local Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, गरज असेल तरच बाहेर पडा

Mumbai Local Mega Block : रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, गरज असेल तरच बाहेर पडा

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी १ : ५५ ते ३ : ५५ या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) ते विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावरील मस्जिद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकात लोकल नसेल. त्यामुळे या भागातील प्रवाशांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी / नेरुळ स्थानकांवर अप व डाउन ट्रान्सहार्बर मार्गांवर सकाळी ११ : १० ते दुपारी ४ : १० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत वाशी / नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाउन ट्रान्सहार्बर मार्गांवरील सेवा पूर्णतः रद्द राहणार आहे.

Comments
Add Comment