Wednesday, January 14, 2026

मुंबई हादरली! आठवीच्या मुलाचं भयंकर कृत्य, आपल्या वर्गमित्रावरच .....

मुंबई हादरली! आठवीच्या मुलाचं भयंकर कृत्य, आपल्या वर्गमित्रावरच .....

मुंबई : मुंबईत सध्या अत्याचार, मारहाणीच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. तसेच अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. अश्यातच मुंबईतील एका नामांकित शाळेतून एक भयंकर घटना समोर आली आहे. अवघ्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रासोबतच घृणास्पद कृत्य केलं आहे.

नेमकं घडलं काय?

मुंबईतील एका नामांकित शाळेत ८ वीत शिकणाऱ्या विद्यार्थी आपल्या वर्गमित्राशी अश्लील वर्तन करायचा, त्यानंतर पुन्हा त्याने वर्गमित्रावर त्याच्या घर जवळील एका निर्जन ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पीडित मुलाने आपल्या आईला सांगितली. पीडित मुलाच्या आईने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आणि तपास कार्यात भयानक गोष्ट समोर आली.  याआधी फेब्रुवारी २०२५ यामध्ये आरोपी पीडित मुलाला मारहाण करत. शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार ही केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान पोलिसांनी posco अंतर्गत गुन्हा दाखल करत, शाळा आणि इतर वर्गमित्रांशी, पालकांशी चौकशी सुरु राहणार आहे. या धक्कादायक घटनेनंतर संबंधित शाळेतील मुलांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >