मनसे नेते मनीष धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. आणि त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मनीष धुरी यांची नाराजी ही कायमची आहे. 'मी नाराज शंभर टक्के आहे. आम्हाला देखील दुसरी खेळी खेळत येते . जर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमावरपर्यंत युती धर्माचे पालन नाही केले, तर मोठं निर्णय घेणार.
माझी नाराजी उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यावर नाही, तर माझी नाराजी ठाकरे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम विधानसभेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आहे. असं मनीष धुरी यांनी सांगितलं. त्याच कारण म्हणजे आम्ही जो प्रभाग मागितला होता, त्या प्रभागात आम्हाला उमेदवारी न देता, त्यांचे विभाग प्रमुख अनिल परब यांनी राज साहेबांचा शब्द देऊन आम्हला विभाग क्रमांक ६६ दिलेला आहे.
ज्या दिवसापासून उमेदवारी जाहीर झाली आहे, त्या दिवसापासून एक ही त्यांचा पदाधिकारी प्रचारात सहभागी होत नाहीये आणि आताही तीच परिस्थिती आहे. आमचे पदाधिकारी जिथे जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे आहेत. तिथे, तिथे युती धर्माचं पालन करत आहेत .






