मोहित सोमण: प्रसिद्ध हॉटेलिंग चेन असलेल्या लेमन ट्री हॉटेल्स समुहाने आज मोठी अपडेट बाजाराला दिली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये नव्या कंपोझिट स्कीम ऑफ अरेंजमेंट अंतर्गत त्यांच्याच दोन उपकंपनीच्या समुहात विलीनीकरणाची (Merger) घोषणा केली आहे. त्यामुळे या योजनेमुळे कंपनीच्या उपकंपनी असलेल्या Carnation Hotels, Jamstede Living या हॉटैलला आपल्या कवेत घेत कंपनी (Lemon Tree Hotel) Fleur Hotels या समुहाशी विलीनीकरण करणार आहे. त्यामुळे नव्या अपेडटनुसार Fleur Hotels आपला काही (३२.९६%), भागभांडवल हिस्सा (Stake) लेमन ट्री हॉटेल्सला विकणार असल्याची माहिती कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत म्हटले. दरम्यान चार लेमन ट्री हॉटेल्सच्या ४ कंपन्या Fleur Hotels विलीनीकरणापूर्वी लेमन ट्री हॉटेल्समध्ये विलीन होतील असे या स्कीम ऑफ अरेंजमेंट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरींग करण्याचे ठरवले असून एकाच छताखाली हॉटेलिंग व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी, वाढत्या कामकाजातील खर्च नियंत्रित करण्यासाठी तसेच आपले डिजिटल इंटिग्रेटेड व्यासपीठ तयार करुन ब्रँड पोझिशनिंग व्यापक प्रमाणात करण्यासाठी हे पाऊल कंपनी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन एक्सचेंज फायलिंगमध्ये, दिलेल्या माहितीनुसार एकूण प्लेअर (Fleur Hotels) कंपनीतील ३२.९६% हिस्सा खरेदी करणार आहे. त्यामुळे लेमन ट्री हॉटेल्सचे भागभांडवल वाढत ४१.०३% हिस्सेदारीत पोहोचले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वारबर्ग पिनकस (Warbug Pincus) यांच्या प्राथमिक गुंतवणूकी व्यतिरिक्त आहेत असे म्हटले. यासह लेमन ट्री हॉटेल्सने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या विलीनीकरणापूर्वी APG Strategic Real Estate Pool NV ही खाजगी इक्विटी गुंतवणूक कंपनी ४१.०९% भागभांडवल हिस्सा खरेदी करणार आहे.त्यामुळे या घडामोडीनंतर Fleur Hotels कंपनीला भविष्यातील आर्थिक सुधारता यावी यासाठी साधारण ९६० कोटींचा निधी या विक्रीतून मिळणारे आहे. यापूर्वी लेमन ट्री हॉटेल्सने २००२ मध्ये स्थापनेनंतर Warbug Pincus कंपनीने २००६ रोजी लेमन ट्री हॉटेल्समध्ये गुंतवणूक केली होती. आज कंपनीकडे २१० पैसा अधिक हॉटेल्स आपल्या पोर्टफोलिओत आहे. कंपनीच्या १३० ठिकाणी १७००० पेक्षा अधिक रूमसह कंपनीचा विस्तार देशभरात झालेला आहे.
लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेड (LTHL) ही भारतातील सर्वात मोठ्या हॉटेल साखळ्यांपैकी एक असून ती अपस्केल, अप्पर मिडस्केल, मिडस्केल आणि इकॉनॉमी या सर्व विभागांमध्ये हॉटेल्सची आपल्या मालकीच्या हॉटेल्ससह भाडेपट्टी, संचालन आणि कंपनीच्या फ्रँचायझी देखील चालवते. LTHL (Lemon Tree Hotels Limited,) वेगवेगळ्या हॉस्पिटलालिटी सेवा प्रदान करते. हा समूह सर्व स्तरांवरील गरजा पूर्ण करण्यासाठी सात ब्रँड्स सादर करतो ज्यात ऑरिक हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, लेमन ट्री प्रीमियर, लेमन ट्री हॉटेल्स, रेड फॉक्स हॉटेल्स बाय लेमन ट्री हॉटेल्स, कीज प्रिमा बाय लेमन ट्री हॉटेल्स, कीज सिलेक्ट बाय लेमन ट्री हॉटेल्स आणि कीज लाईट बाय लेमन ट्री हॉटेल्स यांचा समावेश आहे.
LTHL भारतात आणि परदेशात ८० हून अधिक शहरांमध्ये १३० हॉटेल्स चालवते असून कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आणि भविष्यात १३० नवीन प्रॉपर्टीज सुरू करण्याची योजना आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद यांसारख्या महानगरांपासून ते जयपूर, उदयपूर, कोची आणि इंदूर यांसारख्या टियर २आणि ३ शहरांपर्यंत आणि दुबई, भूतान आणि नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय उपस्थितीसह लेमन ट्री हॉटेल्स अनुभव प्रदान करते. २००४ मध्ये पहिले ४९ खोल्यांचे हॉटेल सुरू केल्यापासून, या समूहाने २६० प्रॉपर्टीजपर्यंत (कार्यरत आणि आगामी) विस्तार केला आहे आणि व्यावसायिक तसेच निवासासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या क्षेत्रात एक विश्वसनीय नाव बनले आहे. काल कंपनीच्या शेअर्समध्ये ०.३०% घसरण झाल्याने दरपातळी १५०.४० रूपये प्रति शेअरवर पोहोचली. गेल्या ५ दिवसात शेअर ०.७१% घसरला असून गेल्या महिनाभरात शेअर्समध्ये ६.८०% घसरण झाली असून संपूर्ण वर्षभरात मात्र ७.१६% वाढ झाली आहे. इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ७.१४% घसरण झाली आहे.






