Sunday, January 11, 2026

मागच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षींच्या विमानसेवेत झाले एवढी वाढ ?

मागच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षींच्या विमानसेवेत झाले एवढी वाढ ?

मुंबई : विमा वाहतुकीबाबतच्या ताज्या अहवालानुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये एकूण ३ लाख ३१ हजार ११ विमानांची वाहतूक झाली. यात ९२ हजार १४१ आंतरराष्ट्रीय आणि २ लाख ३८ हजार ८७० देशांतर्गत विमानं होती. या विमानांद्वारे वर्षभरात ५ कोटी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक झाली. प्रवासी संख्येत २०२४ च्या तुलनेत १.३ टक्क्यांची तर विमान वाहतुकीत २०२२ च्या तुलनेत जवळपास २५ टक्क्यांची वाहतूक झाली आहे.

मुंबईतून प्रामुख्याने दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, दुबई, अबुधाबी, लंडन हिथ्रो आणि सिंगापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक झाली. तसेच २०२५ मध्ये मुंबईतून अल्माटी, अम्मान, बाली (डेनपसार), कोपनहेगन, फुजैराह, क्राबी, मँचेस्टर, तिबिलिसी, आदमपूर, अमरावती, हिंडन, झारसुगुडा, पोरबंदर, सोलापूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.

मुंबईतून २०२५ मध्ये सर्वाधिक विमानं दिल्लीसाठी उडाली. नंतर बंगळुरू आणि गोव्यासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने उड्डाणे झाली. मुंबई - दिल्ली या विमान मार्गावरुन १७ टक्के प्रवासी वाहतूक झाली. मुंबई - दुबई या आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर १५ टक्के प्रवासी वाहतूक झाली. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत मुंबई - दुबई या मार्गानंतर २८.२ टक्‍क्‍यांसह आशिया-पॅसिफिक आणि १४.५ टक्‍क्‍यांसह युरोपचा क्रमांक आहे. मुंबई विमानतळावरुन ये - जा करणाऱ्यांपैकी या सेवा आंतरराष्‍ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्‍ये तर इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत अव्वल आहेत.

मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये होत असलेल्या विमान वाहतुकीमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. विविध शहरांमध्ये कमीत कमी वेळात पोहोचण्यासाठी प्रवासी मुंबईतून विमान प्रवासाचा पर्याय आनंदाने निवडत आहेत.

Comments
Add Comment