Sunday, January 11, 2026

IREDA Q3FY26 Results: कंपनीच्या निव्वळ नफ्यात २२% वाढ तर महसूलातही मोठी वाढ

IREDA Q3FY26 Results: कंपनीच्या निव्वळ नफ्यात २२% वाढ तर महसूलातही मोठी वाढ

मोहित सोमण: आयआरईडीए (Indian Renewable Energy Devlopment Agency Limited IREDA) संस्थेने आज आपल्या तिमाही निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातील निरिक्षणानुसार, कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) निव्वळ नफ्यात (Net Profit) २२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर (FY24) ११९६.८१ कोटी तुलनेत या वर्षीच्या डिसेंबर (FY25) अखेरीस १३८१.३६ कोटींवर नफा वाढला आहे. तसेच कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या ४८३८.२८ कोटी रुपये तुलनेत या वर्षी ६१३५.०८ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या करपूर्व नफ्यात (Profit before tax PBT) इयर ऑन इयर बेसिसवर १४७३.८४ कोटीवरून या वर्षी १७१८.४३ कोटींवर वाढ झाली आहे. तर कंपनीच्या माहितीनुसार, ईपीएस (Earning per share EPS) ४.४५ रुपयांवरून ४.९७ रूपयांवर वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर ४८४०.०८ कोटीवरून ६१५७.६१ कोटींवर वाढ झाली आहे.

दरम्यान कंपनीच्या खर्चातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस ३३६५.२४ कोटी तुलनेत या वर्षीच्या अखेरपर्यंत ४४३९.१८ कोटीवर वाढ झाली आहे. काल कंपनीच्या शेअर्समध्ये २.८९% घसरण झाली असून गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ६.१८% घसरण झाली आहे. गेल्या १ महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये ३.०७% वाढ झाली असून गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३१.८४% घसरण झाली आहे. इयर टू डेट बेसिसवर कंपनीचा शेअर ३.०८% घसरला आहे.

दिल्ली स्थित आयआयईडीए ही १९८७ साली स्थापन झालेली कंपनी नव्या व अक्षय उर्जा निर्मिती व प्रसारात कार्यरत आहे. स्वतः भारत सरकार कंपनीची प्रवर्तक (Promoter) असून कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे.ही कंपनी एक प्रणालीगतदृष्ट्या महत्त्वाची असून ठेवी स्वीकारणारी नसलेली बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC-NDSI) देखील आहे. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी (IFC) म्हणून नोंदणीकृत असलेली NBFC मिडल लेयर (ML) कंपनी आहे. एक विना बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) असल्याने, ही कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे नियंत्रित केली जाते.

Comments
Add Comment