मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक आणि पाया खालची जमीन सरकवून टाकणारी घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधातील वादातून एका महिलेने आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री सांताक्रूझ (पश्चिम) परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी पोलीसांनी कमला संजय कांबळे उर्फ प्रीती (वय ३५) हिला अटक केली असून न्यायालयाने तिला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणामुळे तेथील परिसरांमध्ये खळबळ माजली आहे.
नक्की काय आहे प्रकरण ? ही घटना मुंबईतील सांताक्रुझ मधील आहे..म़त तरुणीचे नाव रेश्मा ढोणे होते व तिचे वय ३७ होते .दोघीजन ही एकमेकाला दहा वर्षाहून ओळखत होत्या असं माहितीतुन समोर आले आहे.दोन्ही ही महीला घर काम करुन गुजराण करत होत्या.प्राथमिक तपासात दोघी रिलेशनशीपमध्ये असल्याचं समोर आलं आहे. पूर्वीच्या भांडणामुळे त्यांच्यामध्ये तणावपूर्ण संबंध असल्याचे समजले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री कमलाच्या घरी पार्टी सुरू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास रेश्मा घरी न आल्याच्या कारणावरून दोघींमध्ये वाद पेटला. “आली का नाहीस तू घरी?” या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद हाणामारीत रूपांतर झाला. रागाच्या भरात कमलाने घरात पडलेला चाकू उचलून रेश्माच्या छातीत वार केला.
रेश्माच्या किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रेश्माच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.






