काँग्रेसचा 'लाडकी बहीण' द्वेषाचा क्रूर चेहरा उघड!

मुंबई : "महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनात ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होऊ नयेत, यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला विकृत चेहरा समोर आणला आहे," अशी घणाघाती टीका भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.


काँग्रेसच्या या भूमिकेचा समाचार घेताना बावनकुळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपला संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, महायुती सरकारने जेव्हा ही योजना सुरू केली, तेव्हापासूनच काँग्रेसने यात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले होते.


सुरुवातीला काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांमार्फत हायकोर्टात याचिका दाखल करून योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला आणि आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन बहिणींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.



बहिणींच्या आनंदावर विरजण घालण्याचे काम'


बावनकुळे पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये जमा करत आहे. या पैशांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळत आहे, संसाराला हातभार लागत आहे. मात्र, बहिणींच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काँग्रेसला सहन होत नाहीये. नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा आता जनतेसमोर आली आहे."



' महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही'


काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचा उल्लेख करत बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकार बहिणींच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. मात्र, काँग्रेसचा हा मत्सर आणि आकस महाराष्ट्रातील माता-भगिनी कधीही विसरणार नाहीत. या विकृत कृतीसाठी राज्याची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

Rahul Gandhi News : निवडणूक आयोगाच्या संयुक्त निवेदनावरून राहुल गांधींवर टीका; देशाच्या जनतेची माफी मागण्याची मागणी

मुंबई : निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांबाबत पसरवण्यात आलेल्या बातम्यांवरून सत्ताधारी पक्षाने

Sanjay Nirpam News: निवडणुकीतील पराभवाचे खापर घटनात्मक संस्थेवर फोडणे थांबवावे, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचे विरोधकांवर शरसंधान

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादी सखोल निरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

PV Sindhu Asian Games 2026 : पी.व्ही. सिंधूचा दमदार विजय; मियाझाकीला मागे टाकत Asian Games 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

PV Sindhu Asian Games 2026 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूने Asian Games 2026 मध्ये दमदार कामगिरी करत जपानच्या टोमोका मियाझाकीचा सरळ

The Paradise Box Office : नानीच्या ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; 2 दिवसांतच कमाईचा वेग मंदावला

मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या

Mumbai Ganpati Visarjan: मुंबईकरांनी साश्रूनयनांनी लाडक्या बाप्पाला दिला निरोप, विसर्जनाच्या दिवशी 35,000 हून अधिक मूर्तीचे विसर्जन

मुंबई: साश्रूनयनांनी काल लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात आला. मुंबईमध्ये अनेक मानाच्या गणपतींसह इतरत्र