नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध 9 ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये 24 तासात 27 स्थिर संनिरीक्षण पथके (SST Team) स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी श्री. सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, दि. 9 जानेवारी रोजी, दुपारी 12.30 वा. दरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी श्री.तुषार दौंडकर तसेच प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार यांच्या नियंत्रणाखाली एकूण रू. १६,१६,०००/ - इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.