Sunday, January 11, 2026

२ जानेवारीपर्यंत ९.८ अब्ज डॉलरने परकीय चलनसाठा घसरला

२ जानेवारीपर्यंत ९.८ अब्ज डॉलरने परकीय चलनसाठा घसरला

मोहित सोमण: आरबीआयने (Reserve Bank of India RBI) आपला विकली बुलेटिनमध्ये नवी आर्थिक आकडेवारी जाहीर केली आहे. त्यातील निरिक्षणानुसार, परकीय चलन साठ्यात (Foreign Exchange Reserves) २ नोव्हेंबरपर्यंत ९.८ अब्ज डॉलरने घसरण झाली असून ती ६८६.८० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर उपलब्ध माहितीनुसार, एमसीए (Foreign Exchange Assets FCA) अर्थात परकीय चलन मालमत्तेत ७.६ अब्ज डॉलरने घसरण झाली असून ती मालमत्ता ५५१.९९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या साठ्यात २.६ अब्ज डॉलरने घसरण झाली असून साठा १११.२६ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. एसडीआर (Special Drawings Right SDRs) २५ दशलक्ष डॉलरने घसरण झाली असून ते १८.७७ अब्ज डॉलरवर पोहोचले. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारताचे रिव्हर्स पोझिशनवरील एसडीआर १०५ दशलक्ष डॉलरने घसरत ४७७.१० अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.

गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात विक्री केल्याने भारतीय रूपयांचे अवमुल्यन झाले होते. त्यामुळे डॉलरला मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झाल्याने आरबीआयच्या हस्तक्षेपानंतर रूपया गेल्या दोन दिवसात सावरला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या डॉलर विक्रीमुळे व वाढलेल्या हेजिंगमुळे परकीय चलनात घसरण झाल्याचे दिसते.

Comments
Add Comment