Monday, February 2, 2026

रात्री उशिरा महिलेने केली ऑर्डर, Blinkit Delivery Boy ला जे आढळले, ते पाहून थरकाप उडेल

रात्री उशिरा महिलेने केली ऑर्डर, Blinkit Delivery Boy ला जे आढळले, ते पाहून थरकाप उडेल

तामिळनाडू : तामिळनाडूमधील घटनेवरुन समजते की माणुसकी अजून जिवंत आहे...Blinkit च्या एका डिलिव्हरी बॅायला रात्री एक ऑर्डर मिळाली, ज्यात उंदर मारण्यासाठीच्या विषारी औषधांच्या तीन पाकिटांचा समावेश होता. रायडर ऑर्डर पत्त्यावर पोहोचला तेव्हा दरवाजा उघडणारी महिला खूपच अस्वस्थ दिसत होती आणि सतत रडत होती. तिच्या वागणुकीवरून रायडरला संशय आला की ही ऑर्डर फक्त डिलिव्हरीसाठी नाही, तर त्यामागे काही गंभीर कारण असू शकते. महिलेने स्वतःला नुकसान पोहोचवण्यासाठी ऑर्डर मागवली आहे का, असे रायडरने थेट विचारले. तिने नकार दिला तरी तिचे वर्तन वेगळे काहीतरी दर्शवत होते. रायडरने परिस्थिती समजून घेत माणुसकीची भूमिका घेतली आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला की कोणतीही समस्या कायमची नसते आणि स्वतःला इजा करणे काहीही उपाय नाही.

शेवटी डिलिव्हरी बॅायने मोठा निर्णय घेतला आणि ऑर्डर रद्द केली. विषाचे पॅकेट्स स्वतःबरोबर परत नेले आणि ही घटना सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे लोकांनी त्याचे कौतुक केले, काहींनी म्हटले, “एखादा रोबो असता तर तो सरळ डिलिव्हरी करून गेला असता,” तर इतरांनी सांगितले, “त्याने फक्त ऑर्डर नाही, तर माणूस पाहिला. हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.”

ही घटना दाखवते की, तंत्रज्ञान आणि अल्गोरिदमने काही निर्णय सोपे केले तरी, माणुसकी आणि संवेदनशीलता या गोष्टी अजूनही अपरिहार्य आहेत. Blinkit च्या या रायडरने केवळ एक ऑर्डर रद्द केलेली नाही, तर एका व्यक्तीचे जीवन वाचवले आणि समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण उभे केले.

Comments
Add Comment