Friday, January 9, 2026

T-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येतील मुख्य आरोपीचा मृत्यु; नक्की काय झाल ?

T-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येतील  मुख्य आरोपीचा मृत्यु; नक्की काय झाल ?

टी-सीरिज म्युझिक कंपनीचे संस्थापक आणि देशातील उद्योगपती गुलशनकुमार यांच्या अंधेरी येथील वैश्नवी देवीच्या बाजुस गोळी झाडुन त्यांची हत्या करण्यात आली होती या हत्येस कारणीभूत असलेला मुख्य शूटर अब्दुल रऊफ उर्फ मर्चंट याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो औरंगाबाद येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा जोगेवरच मृत्यू झाला.

गुलशनकुमार यांची हत्या 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी भागात घडली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ते जितेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिराबाहेर कारमधून उतरत असतानाच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. काही क्षणांतच गुलशनकुमार जमिनीवर कोसळले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीवरून पसार झाले. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.या हत्येमागे अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हात असल्याचे तपासात समोर आले. गुलशनकुमार यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणातून त्यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली. अब्दुल रऊफ उर्फ मर्चंट हा अबू सालेमचा जवळचा सहकारी आणि प्रशिक्षित शार्प शूटर होता. त्यानेच या हत्येत मुख्य शूटरची भूमिका बजावली होती.

पोलिसांनी मर्चंटला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 1990 च्या दशकात अंडरवर्ल्डचा चित्रपट आणि संगीतसृष्टीवर मोठा प्रभाव होता. गुलशनकुमार यांची हत्या ही केवळ खंडणीसाठी नव्हे, तर उद्योगजगतामध्ये भीती निर्माण करण्याचा कट असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले होते. या प्रकरणात अनेक मोठी नावे समोर आली होती आणि हा हत्याकांड आजही देशातील सर्वात गाजलेल्या गुन्ह्यांपैकी एक मानला जातो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >