जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल

एकाच दिवशी ७७८ ठिकाणी केली वनराई बंधाऱ्याची उभारणी


अलिबाग : शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संपूर्ण प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी श्रमदान कार्यक्रम राबवून ७७८ ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली.


वनराई बंधाऱ्यांमुळे ग्रामपंचायती जलसमृ़द्ध होण्यास मदत होणार असून, त्यांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा विशेष उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे, तसेच ग्रामीण भागात जलसंधारणास चालना देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


दरम्यान, यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भासले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी महाड व पोलादपूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील विविध ग्रामपंचायतींना भेट देत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेउन ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत शासनाने वाढविली असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी अशाच उत्स्फूर्तपणे व नियोजनबद्ध पद्धतीने उर्वरित कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले.


ग्रामपंचायतींमध्ये बांधण्यात आलेले बंधारे


अलिबाग ६२, कर्जते ५५, खालापूर ४४, महाड ८३, माणगाव ५७, म्हसळा ३९, मुरुड ५०, पनवेल ७०, पेण ७२, पोलादपूर ३३, रोहा ६१, श्रीवर्धन ३९, सुधागड ३६, तळा ३९, उरण ४ अशा एकूण ८११ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ७७८ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

पनवेल महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असून ५० टक्के आरक्षण

रायगड जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

५ वर्षांत १ हजार १७४ अत्याचाराचे गुन्हे सुभाष म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या

सह्याद्रीतील दुर्गम 'गुळाच्या ढेपा' सुळक्यावर यशस्वी चढाई

सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांची उल्लेखनीय कामगिरी गौसखान पठाण सुधागड-पाली : तालुक्यातील गिर्यारोहक मॅकमोहन

माणगावमध्ये बस आणि स्कूटीचा अपघात, आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

माणगाव : दिघी - पुणे महामार्गावरील मोर्बा रोडवर ट्रॅव्हलर बस आणि स्कूटी

ग्रीन सी प्रजातीच्या कासवाला दिले जीवदान

कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच आढळले हिरवे नर कासव श्रीवर्धन : श्रीवधर्नच्या कोकण किनारपट्टीवर पहिल्यांदाच

भटक्या श्वानांचे होणार सर्वेक्षण

अशी असणार शिक्षकांवर जबाबदारी अलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान