Friday, January 9, 2026

श्री दशभूज लक्ष्मी गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारीपासून माघी जन्मोत्सव

श्री दशभूज लक्ष्मी गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीने २२ जानेवारीपासून माघी जन्मोत्सव

चिपळूण : श्री. दशभूज लक्ष्मी गणेश देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री दशभूज लक्ष्मी गणेशांचा माघी जन्मोत्सव गुरुवार २२ ते २४ जानेवारी तीन दिवस साजरा करण्यात येत आहे.

माघ शुद्ध चतुर्थी पहाटे ५ वा. श्रींची शोडषोपचारे पूजा, सकाळी १० ते १२ श्री मोहक बुवा रायकर डोंबिवली यांचे जन्म सोहळ्याचे कीर्तन, जन्मोत्सव दुपारी २.३० वा. श्रींचे बालमूर्ती भव्य आनंद यात्रा, रात्री भजन माघ शुद्ध पंचमी सकाळी श्रींची शोडषोपचारे पूजा, सकाळी ८ वा. गणेश योग. माघ शुद्ध षष्ठी शनिवार २४ जाने. सकाळी श्रींची शोडषोपचारे पूजा, सकाळी ८ वा. श्री. सत्यविनायक महापूजा, दुपारी ३ वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, हेदवी महिला मंडळाचे भजन, रात्रो. १० वा.मोहक बुवा रायकर डोंबिवली यांचे लळीताचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

श्री. दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान ट्रस्टचे श्री. चंद्रशेखर जोगळेकर,निलेश परशुराम जोगळेकर, उमेश अशोक जोगळेकर यांनी गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment