हैद्राबाद : नुकताच विजय थलापथी याने अभिनय क्षेत्राला कायमचे रामराम ठोकून पूर्णपणे राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. विजय हा तामिलगा वेत्री कगझम हा पक्षासोबत कायमचा राजकारणात उतरण्यापूर्वी 'जन नायगन' हा त्याचा शेतवह चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
नेमकं घडलं काय ?
हाच चित्रपट रिलीज करण्यापूर्वी १८ डिसेंबर रोजी सीबीएफसीकडे सादर करण्यात आला. निर्मात्यांना चित्रपटात २७ कट करण्यासही सांगितले आणि त्या निर्देशांचे पालन करून त्यांनी आवश्यक ते बदलही केले. आणि चित्रपट पुन्हा सादर केला. परंतु सीबीएफसी ने चित्रपटाला पुन्हा पुनरावलोकनसाठी पाठवण्याची आवशक्यता असल्याचे सांगत प्रमाणपत्र दिले गेले नाही.
मद्रास उच्च न्यायालयाचे निर्णय
चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली असता, मद्रास उच्च न्यायालयाने सीबीएफसी ला जन नायगान या चित्रपटासाठी त्वरित U / A प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले. न्यायमूर्ती पी. टी. आशा म्हणाल्या, " साहित्य तपासल्यानंतर हे स्पष्ट होते की नंतर विचारत घेतलेली असलयाचे दिसून येते" न्यायालयाने पुढे म्हटले की, " अध्यक्षांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करणे अधिकारक्षेत्राबाहेरचे आहे. तसेच पुनरावलोकन साठी पाठवलेला अधिकार रद्द करण्यात आला.
रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली
या सर्व दोन दिवसाच्या प्रचंड नाट्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने आणि सीबीआय प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने निर्मात्यांना चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. ९ जानेवारीला प्रदर्शित होणार सिनेमा आता केव्हा रिलीज होणार याची स्पष्ट तारीख समोर आलेली नाही.






