Friday, January 30, 2026

India Post GDS Recruitment 2026 : ना परीक्षा, ना मुलाखत! भारतीय डाक विभागात मेगा भरती; केवळ १० वी पासवर केंद्र सरकारमध्ये व्हा भरती

India Post GDS Recruitment 2026 : ना परीक्षा, ना मुलाखत! भारतीय डाक विभागात मेगा भरती; केवळ १० वी पासवर केंद्र सरकारमध्ये व्हा भरती

नवी दिल्ली : नवीन वर्षात केंद्र सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारतीय डाक विभागाने (India Post) आनंदाची बातमी दिली आहे. संचार मंत्रालयाने देशभरातील विविध टपाल कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या तब्बल २५,००० पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या मेगा भरती अंतर्गत ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.

कोण करू शकतं अर्ज?

या भरती प्रक्रियेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे किमान १० वी उत्तीर्ण असलेले सर्व उमेदवार यासाठी पात्र आहेत. अर्जासाठी इतर काही महत्त्वाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत

दहावी उत्तीर्ण : मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास असणे अनिवार्य.

कौशल्य : उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान आणि गणिताची जाण असावी.

तंत्रज्ञान : संगणकाचे मूलभूत (Basic) ज्ञान असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता : उमेदवाराला सायकल चालवता येणे गरजेचे आहे.

अर्जाचे वेळापत्रक आणि प्रक्रिया : ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तारखांची नोंद घ्यावी

अर्ज सुरू होण्याची तारीख : २० जानेवारी २०२६

अर्जाची शेवटची तारीख : ४ फेब्रुवारी २०२६

निवड प्रक्रिया : या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही पूर्णपणे त्यांच्या दहावीच्या गुणांवर (Merit Basis) केली जाईल. त्यामुळे ज्यांचे दहावीत चांगले गुण आहेत, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी India Post GDS च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन दिलेल्या वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

१० वीच्या गुणांवर लागणार 'मेरिट', असा करा घरबसल्या अर्ज

इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला Indiapostgdsonline.gov.in भेट देणे आवश्यक आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर, 'ऑनलाईन नोंदणी' या पर्यायावर क्लिक करून आपले खाते तयार करा. २. अर्जामध्ये विचारलेली वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरा. ३. फोटो, स्वाक्षरी आणि दहावीचे गुणपत्रक स्कॅन करून अपलोड करा. ४. जर तुम्हाला अर्ज शुल्क लागू असेल, तर ते ऑनलाईन पद्धतीने भरा. ५. सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा. या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमची निवड केवळ दहावीच्या गुणांवर (Merit List) केली जाणार आहे. परीक्षा नसल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही थेट संधी आहे. मात्र, ही संधी साधण्यासाठी तुम्हाला ४ फेब्रुवारी २०२६ या शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज सादर करावा लागेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >