Wednesday, January 14, 2026

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

मीरा-भाईंदर : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मीरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी मंगळवारी (ता. ६) शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या २४ तासांतच बुधवारी (ता. ७) सकाळी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अनिता मुखर्जी या २०१७ मध्ये मीरा रोड येथील प्रभाग क्रमांक १३ मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या धोरणानुसार भाजपने अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली, त्यामध्ये मुखर्जी यांचाही समावेश होता.

मंगळवारी मुखर्जी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. बुधवारी सकाळी आमदार नरेंद्र मेहता यांनी अनिता मुखर्जी यांच्या भाजप प्रवेशाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करत ही घरवापसी जाहीर केली.

Comments
Add Comment