मोहित सोमण: सातत्याने युएस व भारत यांच्यातील द्विपक्षीय करारावर चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र नेमक्या चर्चा कुठे फिस्कटली यावर एका पॉडकास्टमध्ये उत्तर देताना युएस वाणिज्य विभागाचे सचिव (US Commerce Secretary) हॉवर्ड लुटनिक (Howard Lutnick) यांनी मोदींवर खापर फोडले आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्याचे मोदींनी टाळले ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पण मोदींनी प्रतिसाद दिला नसून फोनही केला अथवा उचलला नाही असे म्हटले आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमातून भारतावरील ५००% टॅरिफच्या बातम्यांतून दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असताना हे लुटनिक यांचे वक्तव्य महत्वाचे समजले जाते.
लुटनिक यांनी चार व्हेंचर कॅपिटलिस्ट्सच्या 'ऑल-इन' या अमेरिकन पॉडकास्टवरील मुलाखतीत हे विधान केले असून याआधी युएसने रशियाकडून तेल खरेदी केल्याने ५०% अतिरिक्त दंड व ५०% टॅरिफ घोषित केला होता. या आठवड्यात ट्रम्प यांनी चर्चेसाठी दबाव वाढवल्यानंतर आणि भारताने रशियन तेलाची आयात कमी न केल्यास शुल्क आणखी वाढू शकते असा इशारा ट्रम्प यांनी दिल्यानंतर लुटनिक यांनी हे विधान केले. एकीकडे भूराजकीय अस्थिरता असताना या नव्या करारातील अस्थिरतेचमुळे महिन्यात भारतीय रुपयात विक्रमी नीचांकी अवमूल्यन झाले होते. याच पार्श्वभूमीवर आणि अजूनही हाती न आलेल्या व्यापार करारासाठी द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये प्रगतीची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनतर मोदींनी फोन केला नाही असे म्हणत लुटनिक यांनी भारतावर खापर फोडले आहे.
यावर अधिक माहिती देताना द्विपक्षीय करार रखडण्याचे कारण सांगताना,भारत अजूनही वॉशिंग्टनने ब्रिटन आणि व्हिएतनामला दिलेल्या ऑफरमधील दरासारख्या शुल्काची मागणी करत आहे ज्यावर पूर्वी सहमती झाली होती, परंतु ती ऑफर आता कालबाह्य झाली आहे, असे लुटनिक यांनी पुढे सांगितले. लुटनिक यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया मागणाऱ्या ईमेलला भारताच्या व्यापार मंत्रालयाने तात्काळ प्रतिसाद दिला नाही असा दावाही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाने केला आहे.
गेल्या वर्षी नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचले होते, परंतु संवाद तुटल्यामुळे कोणताही संभाव्य करार कोसळला असे वृत्त प्रसारमाध्यमांनी यापूर्वी दिले होते. लुटनिक यांनी याविषयी अधिक बोलताना, एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने त्यात म्हटले आहे की, मोदींनी ट्रम्प यांना फोन केला नाही, कारण एकतर्फी संभाषणामुळे ते अडचणीत येतील अशी भीती त्यांना होती. म्हणून त्यांनी फोन केला नाही असे म्हटले.
या आठवड्यात ट्रम्प यांनी चर्चेसाठी दबाव वाढवल्यानंतर आणि भारताने रशियन तेलाची आयात कमी न केल्यास शुल्क आणखी वाढू शकते असा इशारा दिल्यानंतर ही टिप्पणी आली आहे.त्यामुळे भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आणि अजूनही हाती न आलेल्या व्यापार करारासाठी द्विपक्षीय वाटाघाटींमध्ये प्रगतीची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या महिन्यात भारतीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा करार एका निश्चितीकडे जाईल अशा आशयाचे विधान केलेले असताना दुसरीकडे काल युएसचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी ट्रम्प यांचा ५००% अतिरिक्त शुल्क धोरणाला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले जात असताना त्यावर भारत काय प्रतिक्रिया देतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी माझे मित्र असल्याचे सांगत माझ्या सांगण्यावरून रशियाकडून भारताने तेल खरेदी थांबवली असे म्हटले होते. प्रत्यक्षात त्यानंतर लगेच लिंडसे ग्रॅहम यांच्या ५००% टॅरिफ विषयी सोशल मिडिया पोस्टवरून खळबळ माजली होती.रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारत,चीन,ब्राझील यांच्यावर युएस ५००% टॅरिफ लावू शकतो असे लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटले होते. याच पैशातून रशियाला युद्धासाठी पैशाची रसद मिळत असल्याचा आरोप त्यांनी भारतावर केला होता. युरोपियन युनियनेही रशियन तेलावर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न केले होते. प्रत्यक्षात युएसने व्हेनेझुएलावर हल्ला केल्याने राजकीय अस्थिरता वाढली असताना भारत आता यावर काय कारणीमासा करेल व तेल व ५००% टॅरिफवर काय भूमिका घेईल ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






