धुरंदर: रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या या चित्रपटामुळे देशभर नव्हे तर जगभर कौतुक होत आहे...व या चित्रपटाने सर्व चाहत्यांच्या मनामध्ये आपली वेगळीच जागा बनवली आहे...आदित्य धर दिग्दर्शित स्पाय थ्रिलर चित्रपट‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाने आता सहाव्या आठवड्यात प्रवेश केला असला, तरी त्याच्या कमाईचा वेग अजूनही कायम आहे. रणवीर सिंहच्या या बहुचर्चित चित्रपटाने भारतात ९०० कोटींच्या दिशेने मजल मारली असून, जगभरात १२०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
जिओ स्टुडिओजने सोशल मीडियावर ‘धुरंधर’च्या ३५ दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची अधिकृत माहिती शेअर केली आहे. पोस्टमध्ये “घातक इन इम्पॅक्ट आणि ग्लोरियस इन स्केल, धुरंधर वर्ल्डवाइड सिनेमागृहांवर राज्य करत आहे” असे नमूद करण्यात आले आहे.जिओ स्टुडिओनुसार, चित्रपटाने ३५ दिवसांत एकूण ८४०.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या ते चौथ्या आठवड्यात चित्रपटाने ७८४.५० कोटी, पाचव्या आठवड्यात ५६.३५ कोटी, तर ३५ व्या दिवशी एकट्या ४.७० कोटी रुपयांची कमाई केली.
या ३५ दिवसांत ‘धुरंधर’ने तब्बल ११ मोठे बॉक्स ऑफिस विक्रम मोडले आहेत. हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला असून, त्याने शाहरुख खानच्या ‘जवान’ला मागे टाकले आहे. यासोबतच ‘धुरंधर’ भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आणि जगभरात पाचवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘धुरंधर’ हा रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील तसेच दिग्दर्शक आदित्य धर यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. याशिवाय, हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ए-रेटेड चित्रपट, २६ दिवसांत ७०० कोटी पार करणारा आणि हिंदी सिनेसृष्टीत दुसऱ्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.






