Friday, January 9, 2026

Bharat Coking Coal IPO: आयपीओ उघडल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात सबस्क्रिप्शन खल्लास!

Bharat Coking Coal IPO: आयपीओ उघडल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात सबस्क्रिप्शन खल्लास!

मोहित सोमण: उघडल्यानंतर अर्धा तासाच्या आत भारत कोकिंग कोल (Bharat Coking Coal) कंपनीचा आयपीओ संपूर्णपणे सबस्क्राईब झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी या आयपीओला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ञांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर गुंतवणूकदारांकडून या आयपीओची मागणी वाढली होती. अखेर प्राथमिक बाजारात संपूर्णपणे आयपीओ सबस्क्राईब झाल्याने कंपनीचे लिस्टिंगही मजबूत होऊ शकते. आज ९ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. संपूर्णपणे हा ऑफर फॉर सेल (OFS) असल्याने कुठलेही फ्रेश इशू बाजारात उपलब्ध नसणार आहे. कंपनीने २१ ते २३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केली होती. कालच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २७३.१३ कोटींचा निधी प्राप्त केला होता तर आज दमदार सबस्क्रिप्शन मिळाले आहे. १४ जानेवारी रोजी पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Share Allotment) होणार असून कंपनीचा आयपीओ १६ जानेवारी रोजी बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध (Listed) होणार आहे.

दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीच्या आयपीओला एकूण ३.४१ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. रिटेल गुंतवणूकदारांकडून आयपीओला ४.६१ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ०.०२ पटीने, ५.४८ पटीने विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून एकूण ७९१६९००० शेअरसाठी १७०१००० बिडींग झाले आहे. तर विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५९३७६७५० शेअरसाठी ३२५३५३००० शेअरचे बिडींग मिळाले आहे.रिटेल गुंतवणूकदारांकडून १३८५४५७५० शेअरसाठी ६३८४९२४०० शेअरचे बिडींग मिळाले आहे.

एकूण १०७१.११ कोटींच्या या बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओसाठी ४६.४७ कोटी शेअर विक्रीसाठी होते. IDBI Capital Market Services Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना १ रूपयांचा डिस्काउंट अथवा सवलत प्रति शेअर घोषित करण्यात आली होती.भारत सरकारच्या कोल इंडियाची ही कंपनी उपकंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या या कंपनीत कोकिग कोल, बिगर कोकिंग कोल (कोळसा) व तत्सम कोळशाचे उत्पादन होते.३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत, कंपनी ३४ कार्यरत खाणींचे जाळे चालवते, ज्यात चार भूमिगत, २६ खुल्या आणि चार मिश्र खाणींचा समावेश आहे.

कंपनीचे मुख्य उत्पादन कोकिंग कोळसा आहे, जो पोलाद आणि ऊर्जा उद्योगांना पुरवला जातो. १ एप्रिल २०२४ पर्यंत, बीसीसीएलकडे अंदाजे ७९१० दशलक्ष टन कोकिंग कोळशाचा साठा आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, बीसीसीएलचा भारतातील एकूण देशांतर्गत कोकिंग कोळसा उत्पादनात ५८.५०% वाटा होता.कंपनी झारखंडमधील झरिया आणि पश्चिम बंगालमधील राणीगंज या भागांमध्ये कार्यरत आहे. ज्यात एकूण २८८.३१ चौरस किलोमीटरचा भाडेपट्ट्याचा क्षेत्रफळ समाविष्ट आहे.

तत्पूर्वी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या मार्च महिन्यातील १४६५२.५३ कोटी तुलनेत या मार्च महिन्यात १४४०१.६३ कोटींवर घसरण झाली होती. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या मार्च महिन्यातील १५६४.४५ कोटी रुपये तुलनेत १२४०.१९ कोटींवर घसरण झाली होती. ईबीटा मार्जिनमध्येही घसरण झाली असून गेल्या मार्च महिन्यातील २४९३.८९ कोटी तुलनेत या मार्च महिन्यात २३५६.०६ कोटींवर घसरण झाली. ईपीएस (Earning per share EPS) आयपीओआधी २.६६ रूपये होते ते नंतर ०.५३ होणार असून पीई (Price to Equity Ratio) गुणोत्तरात मात्र आयपीआधी असलेल्या ८.६४ रूपये तुलनेत आयपीओनंतर ४३.२३ रूपयांवर वाढ होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कमिशन व फी भरण्यासाठी तसेच इतर खर्चासाठी करण्यात येणार आहे असे कंपनीने स्पष्ट केले होते. तज्ञांच्या मते आज दुपारपर्यंत कंपनीच्या जीएमपी (Grey Market Price GMP) मूळ प्राईज बँड तुलनेत ३३ रूपये अधिक प्रिमियम आहे. या आधारे प्रति शेअर ४३.४८% वाढ गुंतवणूकदारांसाठी अपेक्षित आहे.

Comments
Add Comment