मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली. ही योजना सुरू करतानाच राज्य शासनाने पात्रतेचे निकष निश्चित केले होते. पण सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक महिलांनी योजनेचा गैरफायदा घेतला. या प्रकाराचा अंदाज येताच राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलांना केवायसी करण्याचे निर्देश दिले. केवायसी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केलेल्या महिलांना योजनेतून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विहित मुदतीत केवायसी केले नाही तर योजनेचे लाभ दिले जाणार नाहीत असेही जाहीर करण्यात आले. सरकारने हे दिशानिर्देश दिल्यानंतर योजनेतून अनेक महिला बाद झाल्या आहेत
केवायसी करण्याआधी दिशाभूल करणारी माहिती देऊन योजनेचे लाभ घेत असलेल्या अनेक महिला केवायसी केल्यानंतर योजनेसाठी अपात्र झाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजेसाठी जाहीर केलेल्या निकषांनुसार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ मिळू शकत नाही. तसेच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या महिलांना योजनेचे लाभ मिळत नाहीत. पण सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती देऊन अनेक महिलांनी योजनेचे लाभ घेतले होते. आता शासकीय कर्मचारी आणि उत्पन्नाचा नियम या नियमांमुळे अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून बाद झाल्या आहेत. योजनेतून बाद झालेल्या महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण केवायसी केलेल्या आणि योजनेच्या निकषांत बसणाऱ्या पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळत राहतील.
शासकीय सेवेत असलेल्या महिला तसेच अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अपात्र आहेत. पण शासकीय सेवेत नसलेल्या तसेच अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पात्र आहेत. योजनेला पात्र असलेल्या आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांना यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळत राहणार आहेत.






