Thursday, January 8, 2026

मतदारांसाठी डिजिटल माध्यमातून मतदार पोर्टल सुविधा

मतदारांसाठी डिजिटल माध्यमातून मतदार पोर्टल सुविधा

उल्हासनगर महापालिकेचा राज्यात पहिला उपक्रम

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकाने मतदार सुविधा डिजिटल माध्यमातून एकाच व्यासपीठावर आणत राज्यात पहिल्यांदाच असा नावीन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक उपक्रम राबविला आहे. आगामी उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान केंद्र, मतदार यादी, उमेदवारांची माहिती आणि नकाशासह दिशा एका क्लिकवर उपलब्ध करून देणारे 'ऑनलाइन मतदार सुविधा' पोर्टल सुरू केले आहे. या अभिनव उपक्रमामुळे उल्हासनगर महापालिका डिजिटल निवडणूक व्यवस्थापनात राज्यात आघाडीवर पोहोचली असून लोकशाही अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

उल्हासनगर महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात नुकतेच निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते 'ऑनलाइन मतदार सुविधा' पोर्टलचा औपचारिक सुरुवात करण्यात आली.मतदाulalhsnagarरांना कोणत्याही अडथळ्याविना, जलद व अचूक माहिती मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तिडके, पोलीस उपायुक्त सचिन गोरे, उपायुक्त (निवडणूक) विशाखा मोटघरे, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, गणेश शिंपी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'व्होटर स्लिप'वर अवलंबून राहण्याची गरज नाही : या डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा अचूक पत्ता व तेथे पोहोचण्यासाठी जीपीएस नकाशा, मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक व वैयक्तिक तपशील, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे, तसेच प्रभागांची रचना सहजपणे पाहता येणार आहे. या सुविधेमुळे मतदारांना प्रत्यक्ष 'व्होटर स्लिप'वर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

संकेतस्थळावर निवडणूकसंबंधी सर्व माहिती : महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.umc.gov.in निवडणुकीशी संबंधित सर्व महत्त्वाचे दस्तऐवज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये-वैध नामनिर्देशन पत्रे व माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी प्रभागनिहाय अंतिम व पुरवणी मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश प्रारूप व अंतिम प्रभागरचना व सुधारित अधिसूचना यांचा समावेश आहे

Comments
Add Comment