आदिवासी तरुणीची ३ लाखांत खरेदी-विक्री

श्रमजीवी संघटनेने उघडकीस आणला प्रकार, वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


वाडा  : तालुक्यातील गारगांव येथील एका वीस वर्षीय तरुणीला तीन लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने प्रचंड खळबळ उडाली असून श्रमजीवी संघटनेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. सुनील गायधनी (वय ३१), सुमन गायधनी, वाघमारे नावाचा इसम व रघुनाथ दुधवडे अशी आरोपींची नावे आहेत.

तालुक्यातील गारगांव येथील एका वीस वर्षीय तरुणीचा विवाह नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातील वडगांव पिंगळा येथील सुनील गायधनी या तरुणाशी ९ मे २०२४ रोजी झाला होता. प्रारंभी त्यांचा संसार चांगला चालला होता. त्यानंतर घरामध्ये वाद सुरू झाले. या वादातून त्या तरुणीला टोमणे मारणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, शेजारी लोकांशी बोलून न देणे असे प्रकार नवरा व सासुने सुरू केले. त्यानंतर तीन महिन्यांनंतर ही तरुणी माहेरी आली. एक महिना माहेरी राहिल्यानंतर नवऱ्याचे नातेवाईक तिला घरी घेऊन जाण्यासाठी आले व ती पुन्हा सासरी गेली. त्यानंतर नवरा व सासू तिच्याशी नेहमीच भांडू लागले. तू आमच्या घरी राहू नकोस. तुझे लग्न करण्यासाठी वाघमारे व रघुनाथ दुधवडे यांना ३ लाख रुपये दिले होते. आम्हाला ते पैसे परत दे व येथून निघून जा, असे नेहमीच सासरची मंडळी बोलत असत.

२० जून २०२५ रोजी या तरुणीने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिला माहेरी घेऊन गेले. सात-आठ महिन्यांत सासरच्या मंडळींचा तिला एकही फोन कॉल आला नाही. ६ जानेवारी रोजी नवरा, सासू, नणंद आदी नातेवाईक तिला वडगाव येथे घेऊन जाण्यासाठी आले. मात्र सततच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिला सासरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर तू नाही आलीस तरी चालेल, आमचा मुलगा आम्हाला दे असे बोलू लागले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, तालुका अध्यक्ष भरत जाधव, सुजाता पारधी, मीरा टोकरे या कार्यकर्त्यांनी तरुणीला घेऊन थेट पोलीस ठाणे गाठून पती सासु व इतरांवर गुन्हा दाखल केला.
Comments
Add Comment

Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.