Thursday, January 8, 2026

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारीच सादर होणार

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारीच सादर होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामकाज समितीने बुधवारी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रमुख तारखांना मान्यता दिली आहे. संसदीय दिनदर्शिकेनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फेब्रुवारी, रविवार रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करतील.

या आधी २८ फेब्रुवारी १९९९ रोजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्या दिवशी अर्थसंकल्पाची वेळ बदलण्यात आली होती. जुनी परंपरा मोडत त्यावेळी अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर केला गेला होता.

विकसित भारतावर भर

२०२६-२७ चा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण तो जागतिक तणाव आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफच्या भीतीच्या दरम्यान आला आहे. आर्थिक विकासाला परिणामी, पाठिंबा देण्यासाठी आणि जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारताचा दर्जा राखण्यासाठी सरकारने मोठे आर्थिक सुधारणा उपाय हाती घेण्याची अपेक्षा आहे. सरकारचे “विकसित भारत” हे ध्येय लक्षात घेऊन अर्थसंकल्प व धोरणांचे विषय निवडण्यात आले आहेत. १ फेब्रुवारीला पेटाऱ्यात काय अहो, ते स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment