Shreyas Talpade : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन ६ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीझनचं सूत्रसंचालन रितेश देशमुख हा करणार आहे. या शोमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांची यादी समोर आली आहे. मागच्या वेळी म्हणजेच बिग बॉस सीझन ५ ची ट्रॉफी रिल स्टार सूरज चव्हाण यांनी जिंकली. मात्र या वेळी स्पर्धा अजून कठीण आणि टास्कने भरलेली असणारे, जो टिकणार तो जिंकणार. परंतु बिग बॉस ६ मध्ये कोणता कलाकार, इन्फ्लुएंसर किंवा राजकीय मंडळी या शोमध्ये सहभाग घेणार, हे अजूनही अस्पष्ट आहे. मात्र एका नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ज्या अभिनेत्याने माराठीपासून, हिंदी हिंदी सिनेमासृष्टी तसेच साऊथ कलाकारांना देखील आपला आवाज देणारा, श्रेयश तळपदे बिग बॉस मध्ये एंट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच बिग बॉस सिझन ६ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, अद्याप श्रेयस तळपदेच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
प्रेक्षवर्गाला श्रेयश तळपदे बिग बॉस सिझन ६ या शोमध्ये दिसणार की नाही? हे लवकरच कळेल. दरम्यान, श्रेयस तळपदेची एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुफान व्हायरसल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला. तसेच हा सिझन पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढली आहे. तर, काहींनी कमेंट करून, श्रेयस तळपदे बिग बॉसमध्ये जाऊ शकत नाही, अशी कमेंट केली आहे. दरम्यान, श्रेयस तळपदे बिग बॉस सिझन ६ मध्ये दिसणार की नाही? तो स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार की नाही? हे ११ जानेवारीलाच उघड होईल.
श्रेयसने केवळ मराठीतच नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन वर्षात तो अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २०२६ मध्ये तो आझाद भारत, द गेम ऑफ गिरगिट, वेलकम टू द जंगल या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.






