Friday, January 9, 2026

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुसज्ज करण्याच्या कामाची पाहणी केली आणि उपस्थिती अधिकारी- कर्मचारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

बृहन्मंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी प्रभाग क्र. २०१४ ते २२२ चे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे असून त्यांचे कार्यालय विल्सन महाविद्यालयात आहे. श्रीमती शीतल देसाई, श्रीमती यू. टी. मुल्ला, श्री. अमोल मेश्राम, श्री. प्रशांत पाठक आणि श्री. सचिन शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांसह विविध उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील यावेळी उपस्थित होते. या सर्वांशी श्री. वाघमारे यांनी यावेळी चर्चा केली. प्रभाग क्र. २०१४ ते २२२ साठी एकूम ४६७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी एकूण ६१० ईव्हीएम सूसज्ज करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment