Friday, January 9, 2026

भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पायावर सुरुवात, 'मजबूत पाया, पण कळस नाही'- मोतीलाल ओसवाल

भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पायावर सुरुवात, 'मजबूत पाया, पण कळस नाही'- मोतीलाल ओसवाल

मोहित सोमण: मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) ने आपला नवा इक्विटी बाजाराशी संबंधित 'Full Strategy 3QFY26 Preview'नावाचा अहवाल, 'मजबूत पाया, पण कळस नाही' या मथळ्याखाली प्रसिद्ध केला आहे. एकूणच इक्विटी बाजारातील सुधारलेली कमाईची गती, धोरणात्मक प्रोत्साहन आणि लवचिक देशांतर्गत तरलतेच्या पाठिंब्याने, आर्थिक वर्ष २०२६ कॅलेंडर वर्षात भारतीय इक्विटी बाजारासाठी सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आला आहे.

२०२५ मध्ये जागतिक बाजारांच्या तुलनेत कमी कामगिरी करूनही, भारतीय इक्विटी बाजाराची २०२६ मध्ये मजबूत देशांतर्गत पाठबळासह सुरुवात होत आहे. गेल्या वर्षी प्रमुख निर्देशांकांनी एक ते सुरुवातीची दोन अंकी वाढ नोंदवली. निफ्टी ११%, निफ्टी मिडकॅप ६% आणि निफ्टी५०० ७% वाढला असला तरी अहवालातील अभ्यासाच्यमाणे वाढती भूराजकीय अनिश्चितता आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या जावकीमुळे (FIIs Outflow) ते निर्देशांक जागतिक बाजारांपेक्षा मागे राहिले आहेत. २०२५ मध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FIIs) जवळपास १९ अब्ज डॉलर्सचा झाला झाली आहे ज्याचे मुख्य कारण अमेरिकेच्या असमान व्यापारी उपाययोजना (Tariff) होत्या, तरीही त्याला उत्तर म्हणून देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DIIs) एक मजबूत प्रतिसंतुलन म्हणून पुढे आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कमाईतील सुधारणा, मूल्यांकन आणि प्रवाह

MOFSL ने अधोरेखित केले आहे की कमाईतील घसरणीचे चक्र लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, २QFY२६ मध्ये २% वाढ नोंदवली गेली आणि त्यानंतर निफ्टी ईपीएसमध्ये केवळ किरकोळ कपात झाली. FY२६ आणि FY२७ साठी निफ्टी ईपीएस अनुक्रमे १०८४ आणि १२६७ रूपये राहण्याचा अंदाज आहे. मूल्यांकन वाजवी पातळीवर आहे, निफ्टी २१.२ पट पीईवर व्यवहार करत आहे, जो त्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या जवळ आहे आणि सातत्यपूर्ण कमाईच्या वाढीमुळे विस्ताराला वाव मिळत आहे.

देशांतर्गत प्रवाह बाजारांना मजबूत आधार देत आहेत. DIIs ने CY२५ मध्ये अंदाजे ९० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली, ज्याला स्थिर एसआयपी (Systematic Investment Plan SIP) प्रवाहांचा पाठिंबा होता, ज्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FIIs) विक्री आणि प्राथमिक बाजारातील मजबूत इश्यू दोन्ही पचवण्यास मदत झाली. अहवालाने पुढे म्हटले आहे की ऐतिहासिकदृष्ट्या, अगदी माफक परदेशी गुंतवणूक प्रवाहामुळेही बाजारात मोठी तेजी आली आहे तर देशांतर्गत सहभाग बाजारातील घसरणीचा धोका मर्यादित ठेवेल अशी अपेक्षा आहे.

यासह MOFSL नमूद करते की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि सरकारने केलेल्या धोरणात्मक कृती महत्वाची होती. ज्यामध्ये एकत्रित व्याजदर कपात, तरलतेचे इंजेक्शन (Liquidity Inject) जीएसटी २.० मधील कपात आणि वैयक्तिक आयकर सवलती यांचा समावेश आहे. अर्थात आर्थिक वर्ष २०२६ पासून देशांतर्गत वाढीच्या प्रेरणांमध्ये पूर्णपणे प्रतिबिंबित होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर, ही फर्म भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला (Billateral Trade Agreement BTA) एक महत्त्वाचा उत्प्रेरक (Catalyst) मानते जो FII सहभाग पुन्हा सुरू करू शकतो आणि बाजाराचे पुनर्मूल्यांकन घडवून आणू शकतो.

कमाईचा दृष्टिकोन: आठ तिमाहीतील सर्वात मजबूत (Earning Outlook)

अहवालानुसार, ३QFY२६ मधील कमाई आठ तिमाहीतील सर्वात मजबूत कामगिरी दर्शवेल, ज्यात MOFSL च्या विश्वातील कंपन्यांकडून वार्षिक १६% करोत्तर नफा (Profit after tax PAT) वाढ अपेक्षित आहे. अहवालानुसार, ते मार्केटिंग (विपणन) कंपन्यांना वगळल्यास, बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढ मंदावली असूनही, कमाईची वाढ वार्षिक १३% च्या निरोगी दराने अपेक्षित आहे असे निरिक्षण अहवालाने नोंदवले आहे. एकूण कमाईतील सुधारणा व्यापक झाली आहे. त्यातील एकूण २० क्षेत्रे दोनअंकी वाढ नोंदवण्याची शक्यता आहे, जे FY२५ मध्ये सुरू झालेल्या कमाईच्या मंदीच्या चक्राच्या समाप्तीचे संकेत देते. जीएसटी २.० कपात, सणासुदीची मागणी, सुलभ व्याजदर आणि वाढलेल्या खर्चयोग्य उत्पन्नामुळे विवेकाधीन उपभोगात लक्षणीय पुनरुज्जीवन दिसून आले आहे.

प्रमुख क्षेत्रीय चालक घटक (Main Sectoral Growth Driver)

तिमाही ३FY२६ मधील कमाईची वाढ तेल आणि वायू (+२५%), एनबीएफसी कर्जपुरवठा (+२६%), ऑटोमोबाईल्स (+२५%), धातू (+१५%), दूरसंचार (मागील वर्षाच्या तुलनेत २.६ पट नफा वाढ), स्थावर मालमत्ता (+६४%), भांडवली वस्तू (+२४%) आणि सिमेंट (+६६%) या क्षेत्रांमुळे होईल अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रांचा इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कमाईमध्ये जवळपास ७७% वाटा असेल असा अंदाज आहे, तर पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि मिडिया क्षेत्र कमकुवत राहण्याची शक्यता आहे.

CY२६ साठी भारताची रणनीती (Next Strategy)

मोतीलाल ओसवाल (MOFSL) चा विश्वास आहे की मजबूत मॅक्रो मूलभूत घटकांच्या आधारावर, भारतीय इक्विटीज २०२६ मध्ये जागतिक स्तरावरील कमी कामगिरीची काही प्रमाणात भरपाई करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत. जीडीपी वाढ मजबूत आहे, महागाई नियंत्रणात आहे, आणि FY२५-२७ दरम्यान MOFSL च्या विश्वासाठी कमाईचा सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR) १५% आणि निफ्टीसाठी १२% राहण्याचा अंदाज आहे.

फर्मच्या पसंतीच्या गुंतवणूक क्षेत्रांमध्ये ऑटो, विविध वित्तीय सेवा, औद्योगिक आणि ईएमएस, ग्राहक विवेकाधीन वस्तू आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. टॉप निफ्टी-५० कल्पनांमध्ये SBI, Titan, M&M, Infosys आणि Eternal यांचा समावेश आहे. पसंतीच्या नॉन-निफ्टी स्टॉक्समध्ये Dixon Technologies, Indian Hotels, Groww, TVS Motors आणि Radico Khaitan यांचा समावेश आहे. 'देशांतर्गत विकासाचे घटक दृढपणे स्थापित झाल्यामुळे आणि कमाईची गती वाढत असल्याने, भारत २०२६ कॅलेंडर वर्षात अधिक मजबूत स्थितीत प्रवेश करेल. जागतिक अनिश्चितता कायम असली तरी, बाह्य भावनांमध्ये कोणतीही सुधारणा विशेषतः भारत-अमेरिका व्यापार कराराद्वारे बाजाराच्या महत्त्वपूर्ण पुनर्मूल्यांकनासाठी एक महत्त्वाचा पूरक घटक ठरू शकते' असेही अहवालात यावेळी नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >