मोहित सोमण: या आर्थिक वर्षातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) या निर्देशांकातील नव्या पुनर्संतुलन (Rebalancing) प्रकियेसह आगामी भूराजकीय स्थितीतील अस्थिरता व आगामी युएस पेरोल रोजगार आकडेवारी पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगल्याने चांदी सलग दुसऱ्यांदा कोसळली आहे. चांदी दिवसभरात थेट ४% कोसळली असल्याने कमोडिटीतील गुंतवणूकदारांना यांचा मोठा फटका बसला आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ५ रूपयांवर घसरण झाली असून प्रति किलो दरात ५००० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५२ प्रति किलो दर २५२००० रूपयावर पोहोचले आहेत. काल १०००० रूपयांनी चांदी घसरल्यानंतर आज पुन्हा एकदा चांदी ५००० रुपयांनी घसरली आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर २५२० रूपये तर प्रति किलो दर २५२००० रुपयांवर पोहोचले आहेत.
संकेतस्थळावरील माहितीनुसार, गेल्या ४ दिवसात चांदी १३००० रुपयांनी वाढली आहे. संपूर्ण वर्षभरात चांदीच्या दरात १४०% वाढ झाल्याने भौतिक व ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. युएससह जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेमुळे चांदी मोठ्या प्रमाणात अस्थिरत आहे. दरम्यान आगामी युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितता, युएस पेरोल आकडेवारी यामुळे गुंतवणूकदारांनी नवी गुंतवणूक टाळली असून इंडेक्स पुर्व संतुलित केल्याने एकत्रित परिणाम म्हणून चांदी आणखी घसरली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) बाजारात चांदी ३ ते ४% दिवसभरात कोसळली. संध्याकाळपर्यंत चांदीच्या निर्देशांकात ३.३०% घसरण झाल्याने प्रति किलो दरपातळी २४२३२७ रुपयांवर व्यवहार करत आहे. जागतिक स्तरावरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.७४% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ७५.४८ औंसवर पोहोचली आहे. जी परवा ७९.८९ या सर्वोच्च इंट्राडे उच्चांकावर पोहोचली होती.
मागील सत्रात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने आणि ते ३.१७% ने घसरून २५०६०५ पातळीवर स्थिरावले होते . आता गुंतवणूकदारांनी अस्थिरतेत मजबूत तेजीनंतर नफा बुक सुरु केले आहे. ईटीएफ होल्डिंगमध्ये सलग तिसऱ्या दिवशी ३.२ दशलक्ष औंसपेक्षा जास्त घट झाली असून अमेरिकेतील मिश्र आर्थिक संकेतांमुळे ही घसरण आणखी वाढली. एडीपी डेटानुसार डिसेंबरमध्ये खाजगी वेतनात केवळ ४१००० ने वाढ झाली, जी अपेक्षेपेक्षा कमी होती, तर अमेरिकेतील उत्पादित वस्तूंच्या ऑर्डरमध्ये महिन्या-दर-महिना (MoM) १.३% घट झाली, ज्यामुळे औद्योगिक दृष्टिकोनातील मृदूपणा दिसून आला आहे.






