Thursday, January 8, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : आम्हाला आमच्या मर्यादेची...शक्तीस्थळाची कल्पना आहे... तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात, पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देण्यात आला आहे, मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जाईल.प्लास्टिक बंदी कडक करणे, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी उभारणार,मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशनवर भर, मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार, दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार,एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी आदी मुद्यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे. आम्हाला आमच्या मर्यादेची...शक्तीस्थळाची कल्पना आहे... तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात, पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देण्यात आला आहे, मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जाईल.प्लास्टिक बंदी कडक करणे, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी उभारणार,मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशनवर भर, मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार, दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार,एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी आदी मुद्यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा