Friday, January 9, 2026

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.अशी माहिती पोलीसांकडुन समोर आली आहे. अपघातात नाशिकहून पेठकडे जात असलेली कार आणि विरुद्ध दिशेने येणारी दुसरी कार धडकली. धडक इतकी जोराची होती की दोन्ही वाहनांचे अवशेष चक्काचूर झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहेत.

जखमींवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर्सनी सांगितले आहे. माहिती नुसार, प्रवासी शिर्डी येथे साईंचे दर्शन घेऊन नाशिकमार्गे गुजरातमधील वापीकडे जात असताना चाचडगाव टोलनाका पार केल्यानंतर अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.हे अपघात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण अपघातासारखेच आहे. राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबेरे गावाजवळ रिक्षा आणि मिनीबसची समोरासमोर धडक झाली होती, ज्यात इगतपुरीजवळील गिरणारे येथील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन गंभीर जखमी झाले.

विशेष म्हणजे या अपघातात मृतकांमध्ये दीपक जगन डावखर (वय २२), आकाश मनोहर डावखर (वय २२), दीपक विजय जाधव (वय २२) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये रुपेश गणेश भगत (वय १९) आणि रोशन गंगाधर डावखर यांचा समावेश आहे.

प्रशासनाने अपघाताच्या कारणाची चौकशी सुरू केली असून, महामार्गावर वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिक सतर्कता घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment