Friday, January 9, 2026

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांच्या दरम्यान उभ्या असलेल्या कचरा उचलणाऱ्या (गार्बेज स्पेशल) लोकल ट्रेनला अचानक भीषण आग लागली. आगीचे धूर आणि धुराचे लोट आकाशात उंचवर दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यामध्ये आगीचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने, ही कचरा वाहतूक करणारी गाडी असल्याने आणि प्रवासी डबे नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, रेल्वे प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

काय घडलं नेमकं?

अप स्लो मार्गावरील वाहतूक सुरक्षेसाठी थांबवली

मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील सायडिंगमध्ये उभ्या असलेल्या कचरा उचलणाऱ्या लोकल ट्रेनला आज रात्री भीषण आग लागली. या आगीची तीव्रता पाहता, सुरक्षेचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने रात्री ८:४५ वाजल्यापासून 'अप स्लो' (CSMT कडे जाणारी) मार्गावरील वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठ्या विलंबाचा सामना करावा लागत आहे. आगीची बातमी समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेचे तांत्रिक पथक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेमुळे विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यानची संथ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर आणि ओव्हरहेड वायरची सुरक्षितता तपासल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >