मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष पण थेट शब्दांत निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात एकच ब्रँड होता आणि तो म्हणजे हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यानंतर महाराष्ट्रात कोणीही ब्रँड नाही.” तसेच, स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा आम्ही निवडणुकीत “बँड वाजवू”, असा इशाराही त्यांनी दिला. महायुतीमध्ये कोणीही स्वतःला ब्रँड समजून जनतेसमोर येत असेल, तर त्याचा राजकीय बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
दरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “अजित पवार हे महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे आका आहेत,” असा आरोप करत, “भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, “१५ तारखेनंतर जनता ठरवेल कोण काय आहे.”
आगामी काळात शिवतीर्थावर ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ऐतिहासिक सभा होणार असल्याचं चित्र आहे. तसेच, “उल्हासनगरमध्ये गुंडाराज चालणार नाही,” असा ठाम इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला






