Thursday, January 8, 2026

चीन, इराण, रशिया आणि क्युबाशी आर्थिक संबंध तोडा : अन्यथा… तेल उपशावर बंदी

चीन, इराण, रशिया आणि क्युबाशी आर्थिक संबंध तोडा : अन्यथा… तेल उपशावर बंदी

डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हेनेझुएलाला नवा इशारा

वॉशिंग्टन : व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉर्डिग्ज यांच्या नेतृत्वाखालील नवीन राजवटीने चीन, रशिया, इराण आणि क्युबाशी आर्थिक संबंध तोडले तरच अधिक तेल पंप करण्याची परवानगी दिली जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना यावेळी पकडण्यात आले. तेव्हाच डेल्सी रॉर्डिग्ज यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. बाजारभावानुसार व्हेनेझुएलाने अमेरिकेला तेल विकण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलाच्या नवीन नेतृत्त्वाला सांगितले की, जर त्यांनी त्यांच्या अटींचे पालन केले तरच त्यांना त्यांच्या स्वतःच्या साठ्यातून अधिक तेल काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

चीन, रशिया, इराण व क्युबा या देशांशी व्हेनेझुएलाने आर्थिक संबंध तोडावेत, व्हेनेझुएलाने केवळ अमेरिकेशी भागीदारी करावी, असे अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. चीन हा व्हेनेझुएलाचा सर्वांत मोठा तेल खरेदीदार आहे.

Comments
Add Comment