Friday, January 9, 2026

Beed Crime News :"बीडमध्ये भररस्त्यात गोळीबार;अनैतिक संबंधांचा भयंकर कट उघड!

Beed Crime News :

बीड: बीडमध्ये मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास अंकुश नगर येथे जोरदार गोळ्याचा आवाज आला.. तेव्हा एका तरुणाची भररस्त्यात गोळ्या झाडुन व धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली.या घटनेमुळे बिड जिल्ह्यात जोरदार गोंधळ उडाला आहे.पोलासांच्या तपासात ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा पोलीसांचा अंदाज आहे..

नक्की घडलं तरी काय?

घटनेची सविस्तर माहिती अशी की, हर्षद उर्फ दादा शिंदे या मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अंकुश नगर भागातील एका नाल्याच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी आरोपी विशाल सूर्यवंशी तिथे आला आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राऊंड फायर केले. जीव वाचवण्यासाठी हर्षद पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले. ह्या हल्ल्यामुळे हर्षद शिंदे जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे तेथील नागरिंकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे..

घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी सध्या फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथकं रवाना केली आहेत. प्राथमिक चौकशीत पोलिसांनी या हत्येमागे अनैतिक संबंधांचे कारण असण्याचा अंदाज वर्तवला आहे, परंतु नेमकं कारण आरोपी पकडल्यानंतरच स्पष्ट होईल. भररस्त्यात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे अंकुश नगर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा प्रभाव उरला आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणातील सर्व दुवे शोधून काढत असून, या हत्येमागील इतर सहभागींचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment