Thursday, January 8, 2026

अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे' खास फोटो

अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे' खास फोटो

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच घर हे खूप सुंदर आहे. घरातील भडकपणा टाळून साधेपणा जपण्यात आलेला आहे, हे या फोटोमधून दिसून येते. एकदम साध पण तेवढच आकर्षक अशा थीमने संगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. घरातील रंगाच्या थीममध्ये व्हाइट थीम ही दिसून येते, अगदी स्वच्छ, शांत आणि सुंदर असं घर या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. पांढऱ्या रंगामुळे घरात प्रकाश अधिक परिवर्तीत होतो आणि त्या प्रकाशमुळे संपूर्ण घर उजळून निघते. या फोटोमध्ये घरात जास्त सामानाची गर्दीही निदर्शनास येत नाहीये. आवश्यक तेवढ्याच वस्तु आणि मोजक्या फर्निचरमुळे घर अजून उठून दिसते.

तेजस्विनीच्या लिव्हिंग रूममध्ये राखाडी रंगाचा टीव्हीचा पॅनल हा व्हाइट थीमला छानसा शोभतोय . घरात ठिकठिकाणी ठेवलेली हिरवी झाडे घरच्या सौंदर्यात भर घालतात. या झाडांमुळे मन शांत आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. घरतील व्हाइट थीमला राखाडी रंगाचे पडदे सुंदरपणे पूरक ठरतात. हे पडदे घरात येणार प्रकाश नियंत्रित करतात आणि खोलीत सौम्य उजेड पसरवतात . भडक किंवा जड डेकोर न करता ही साध्या , सोप्या आणि उपयोगी वस्तूंची निवड त्यांनी घरच्या सजावटीसाठी वापरली आहे. यामुळे घरात मोकळी ढाकळी जागा ही राहते , जिथे आपण सहजरित्या वावरू शकतो. अशाच फर्निचरचा वापर करून अभिनेत्रीने घर सजविले आहे.

व्हाईट आणि राखाडी रंगांच्या संयोजनात घरात हलकासा गोल्डन टच देण्यात आला आहे. हा रंग भडक न वाटता घराच्या सौंदर्यात उठाव आणतो. त्यामुळे फोटो फ्रेम्स, लाइट फिक्स्चर, शोपीस किंवा छोट्या सजावटीच्या वस्तूंमध्ये गोल्डन रंगाचा वापर केल्याचे दिसते. या गोल्डन टचमुळे घराला सौम्य लक्झरी लुक मिळतो. संपूर्ण डेकोर साधा असतानाही हा रंग घराला खास आणि आकर्षक बनवतो. व्हाईट थीममध्ये गोल्डन रंगाचा मर्यादित वापर केल्यामुळे घराची एलिगंट शैली अधिक खुलून दिसते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >