Friday, January 9, 2026

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची मोठी भेट दिली आहे. ३२,६७९ शिपाई आणि समकक्ष पदांच्या थेट भरतीसाठी सरकारने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षांची शिथिलता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना आता पोलीस दलात सामील होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे. ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील तरुण वयोमर्यादा वाढवण्याची मागणी करत होते. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गृहविभागाला निर्देश दिले आणि ही सवलत ‘एक वेळची संधी’ म्हणून लागू करण्यात आली.
Comments
Add Comment