Wednesday, January 7, 2026

वर्षा उसगांवकर यांनी आपल्या आईबद्दल केला मोठा खुलासा, मी माझ्या आईला घेऊन...

वर्षा उसगांवकर यांनी आपल्या आईबद्दल केला मोठा खुलासा, मी माझ्या आईला घेऊन...

मुंबई : मराठी चित्रपटविश्वात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवला. अगदी कमी वयात आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु करून वर्षा उसगावकर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटात देखील आपली अभिनयाची छाप पाडली. अगदी उतार वयातही त्यांनी मालिकेत आपले काम सुरु ठेवलेच आहे. मागच्या वर्षीच बिग बॉस सीझन ५ मधेही वर्ष उसगावकर यांनी सहभाग घेतला होता. वर्ष उसगावकर यांचा चाहता वर्गही जास्त आहे. आजही त्यांचे चित्रपट अगदी आवडीने पाहिलेही जातात. वर्षा उसगावकर यांच्या खासगी आयुष्यापेक्षा त्यांचे कामच जास्त चर्चेत राहिले आहे.

आता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास वर्ष उसगावकर यांचे सासरे म्हणजेच प्रसिद्ध संगीतकार रवी शंकर शर्मा. यांनी वर्षा यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही संपत्तीतून बाहेरचा रस्ता दाखवला बेखल केले.आणि आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलींच्या नावावर केली.

वर्षा उसगांवकर यांचा मातोश्रीच्या शेजारी बंगला आहे. त्यामुळे'बाळासाहेब ठाकरे वर्षा उसगांवकर यांचे शेजारी होते. नुकताच एका वर्षा उसगांकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक किस्सा सांगत आपल्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

वर्षा उसगांवकर या म्हणाल्या की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घर शेजारी होते. त्यामुळे मला छान २४ तास पोलिस संरक्षण असायचे. मला कधीही कलानगरमध्ये जानाता भीती वाटली नाही. रात्रीचे कितीही वाजूदेत पोलिस संरक्षण कायम. मला ते घरीबोलावून गोष्टी सांगायचे. कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप जास्त खेळकर होता. मला नेहमी म्हणायचे की, काय गं… गोव्याची मुलगी कसं काय गोव्याहून इथं आलीस. गोव्याची मुलगी दामूकडे राहतेस.. असे ते कायम बोलायचे. एकदा माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप जोक्स वगैरे सांगितले.. ते बोलायचे की, मी बियर पितो.. दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे. मी त्यावेळी म्हटले बापरे हे बियर पितात आणि असे सांगतात पण… म्हणजे असा गमतीशीर त्यांचा स्वभाव होता. मग ते मिथूनला फोन लावणार याला फोन लावणार.. मग त्यांच्याशी आमचे बोलणे करून देणार, असा त्यांचा स्वभाव होता खूप जास्त छान.. त्यांचे मार्मिक बोलणे मला कायम आवडायचे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >